करंबळ:
खानापूर तालुक्यातील खानापूर-हल्याळ मार्गावर असलेल्या करंबळ सह पाच गावांना संबंधित असलेली ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा येत्या 2024 फेब्रुवारीमध्ये भरवण्याचा निर्णय ग्रामस्थ, पंच कमिटीने घेतला आहे.
या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच गावच्या पंच कमिटीतून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड सोमवारी झालेल्या एका बैठकीत करण्यात आली.
यात्रा कमिटी अध्यक्षपदी सातेरी रामचंद्र घाडी,
सोमवारी पाचही गावच्या प्रमुख मंडळी व पंच कमिटीची बैठक लक्ष्मी मंदिर मध्ये पार पडली. यामध्ये यात्रा कमिटी अध्यक्षपदी सातेरी रामचंद्र घाडी( होनकल), कार्याध्यक्षपदी महादेव नारायण गाडी (करंबळ), उपाध्यक्षपदी रामचंद्र दत्तोबा पाटील (कौंदल), सेक्रेटरीपदी श्री नामदेव सातेरी गुरव (जळगे), उपसेक्रेटरी पदी श्री बुद्धाप्पा गंगाप्पा चौगुले (रूमेवाडी) तर खजिनदारपदी श्री जयंत ज्योतिबा पाटील (करंबळ) याप्रमाणे 30 जणांची कार्यकारणी व पाच लोकांची सल्लागार कमिटी रचना करण्यात आली आहे.
यासंदर्भात सोमवार दि. 20 रोजी येथील श्री लक्ष्मी मंदिरात व्यापक बैठक झाली. यामध्ये मागील यात्रा कमिटीत झालेल्या जुन्या पंचमंडळी मधून काही प्रमुख तर नवीन काही होतकरूंना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता करंबळ ग्रामदेवता श्री लक्ष्मी यात्रा उत्सवाचे वेध या पाचही गावात लागले आहेत. करंबळ, कौंदल, होनकल, जळगे,रूमेवाडी या पाचही गावांना संबंधित असलेले ही ग्रामदेवता जागृत देवता ओळखली जाते.
या गावची यात्रा 2005 मध्ये भरवण्यात आली होती. त्यानंतर 2017 -18 मध्ये यात्रा भरवण्याचा निर्णय झाला होता.परंतु कोरोना महामारी त्याचप्रमाणे या मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे जिर्णोदराचे काम हाती असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर यात्रा भरवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थ कमिटीने घेतला होता. मंदिराचे कामही पूर्ण झाल्याने आता 2024 फेब्रुवारीमध्ये यात्रा भरवण्याचा निर्णय अंतिम झाला असून वरील प्रमाणे कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवड कार्यकारणीचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.