रामनगर- धारवाड रामनगर या राज्यमार्गावरील तावरकट्टी नजीक बुधवारी रात्री एका वाहनाला अपघात झाल्याने एक ठार झाल्याची घटना घडली आहे.
नागरगाळी- तावरकट्टी दरम्यान एका अरुंध व धोकादायक वळणावर सुसाट वाहनांच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात आंध्रा मधील एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, बुधवारी रात्री गोवा येथून पर्यटन करून तमिळनाडू येथील, पाच पर्यटक पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले असता, नागरगाळी ते तावरकट्टी येथील वळणावर फोर्ड कंपनीची कार रस्ता सोडून खाली उतरून झाडाला धडकल्याने, कार मधील विनोद कुमार वय वर्षे 32 राहणार मदुराई तमिळनाडू, हा उपचारासाठी नेत असताच त्याचा वाटेतच मृत्यू झाला, तर इतर जखमींना अळनावर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले ,घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात झाली आहे.