खानापूर: गेल्या पाच फेब्रुवारी रोजी गोवा बोरी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर तालुक्यातील कल्लाप्पा तिरविर राहणार तोपिंग करते यांनी पन्नास वर्षावरील गटामध्ये माउंटेन रन 15 किलोमीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर माग वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र पंढरपुर येथे देखील 5 फेब्रुवारी झालेल्या पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील गटात कुमार वेदांत होसुरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे
श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तीरवीर व कुमार वेदांत रामा होसुरकर हे तोपिंणकट्टी गावचे सुपुत्र आहेत यांचे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक तोपिनकट्टी गावामध्ये झाले आहे
श्री तीरवीर हे आज कोल्हापूर येथे स्वतःच्या व्यवसायानिमित्त राहतात व्यवसायात उत्तम प्रगती साधून आपले ध्येय गाठण्यास सातत्याने दररोज 15 किलोमीटर धावणे सराव करतात. त्यांना गर्ल गुंजीचे प्रशिक्षक अशोक पाटील तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक एल जी कोलेकर , सुभाष पवार कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कोच यांचे मार्गदर्शन आणि वडील बंधू यल्लाप्पा तीरवीर संचालक महालक्ष्मी ग्रुप तोपिंनकट्टी व खानापूर क्रीडा संकुल चे प्रमुख एल डी पाटील गर्लगुंजी माजी मुख्याध्यापक यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभत आहे.
कुमार वेदांत होसुरकर हा सरकारी कन्नड शाळा दौलती ता. खानापूर सातवी मध्ये शिकत आहे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वेदांत होसुरकर हा 18 फेब्रुवारी 2023 ला बेंगलोर येथे प्राथमिक राज्यस्तरीय स्पर्धेकरिता भाग घेणार आहे . अशा या गुणी धावपटूंचा समाजाकडून संघ संस्था कडून अभिनंदन व गौरव होत आहे