WhatsApp Image 2023-01-26 at 5.51.08 PM

खानापूर तालुक्यातील घोटगाळी येथे जवळपास 15 ते 18 लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना गुरुवारी पार पडली.
यावेळी मंदिराचा कळसारोहण भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी वारकऱ्यांच्या समवेत टाळभजन मध्ये सहभाग घेतला. व धार्मिक विधीही त्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले, विठ्ठल रुक्माई ही आमच्या सर्वसामान्य भक्तांची खरी देवता आहे. त्यामुळे गावागावात नामस्मरण तसेच संस्कृती जतन करण्याचे काम आपण केले. तर उज्वल आयुष्य भरण्यास वेळ लागत नाही. समाजकारणाबरोबर धार्मिक कारण उज्वल करण्यासाठी राज्यातील व देशातील भाजप सरकारने अनेक योजना धर्म संस्कृतीसाठी अमलात आणले आहेत. याशिवाय विकास कामेही मंजूर करत असताना अनेक लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. पण आपल्या तालुक्यात भाजपचे प्रतिनिधित्व नसल्याने येणारा सरकारी निधी त्याचा परिपयोग होत नाही. याकरिता सरकारी निधीचा सदुपयोग करण्यासाठी ज्यांचे सरकार त्यांचाच प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने कर्नाटक राज्यात तसेच मोदी सरकारने संपूर्ण देशात राबवलेल्या सरकारी योजना आज सर्वसामान्य पर्यंत पोहोचले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार येणार यात शंका नाही. यासाठी या भागातील नागरिकांनी आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहावे, भाजपच्या माध्यमातून येणारी विकास कामे आगामी काळात आपल्या सहकार्यातून व्यवस्थित राबवून या भागातील रस्ते पाणी समस्या किंवा मंदिरांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्याबरोबर राहील असे प्रतिपादन भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. रफीक हलसीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून या मंदिराचे व्यवस्थापन व वारकरी मंडळींनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. गावातील वारकरी हभ प महादेव वीर, पांडुरंग देवारकर, शांताराम कुंभार, सहदेव कुंभार, सुरेश कुंभार यासह भाजप नेते राजेंद्र रायका, चांगाप्पा निलजकर, खेमराज गडकरी यासह अनेक वारकरी व निमंत्रित मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us