DSC_0088 -1

खानापूर : माजी आमदार प्रल्हाद रेमाणी
खानापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगून अहोरात्र भारतीय जनता पार्टी पक्षाला बळकट करण्याबरोबर तालुक्यातील सर्वसामान्य मानसे जोडण्याचे काम हाती घेऊन झटणारे व्यक्तिमत्व व तालुक्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहोचवणारे पोलादी पुरुष म्हणजे माजी आमदार कै. प्रल्हाद कल्लाप्पा रेमाणी यांचे नाव आजही अमर आहे. या सामाजीक, शैक्षणीक ,धार्मीक, व औद्योगीक क्षेत्रात क्रांती करणार्‍या दूरदृष्टी व विकासाभिमुख नेतृत्वाला हिरावून आज पाच वर्षे झाली दि. 22 जानेवारी 2018 आकस्मीकपणे हिरावून नेले. अन तालूक्याचा एक विकासपूरूष हरपला. त्यांच्या जाण्याला तिथी प्रमाणे आज दि. 26 जानेवारी 2023 रोजी पाच वर्ष होत आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा लेखाजोगा लिहून न संपणारा व आठवणीना उजाळा देणारा अल्पशा जिवन परीचय…
खानापूर तालूक्यात 2008 ते 2012 या पाच वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर विकास म्हणजे काय याचे उतर दिले.आमदारकीच्या पाच वर्षात तब्बल 450 कोठीचा निधी आणून अनेक कामे मार्गी लावण्यात त्यानी यश मिळवली. प्रामूख्याने आमदारकीच्या काळात मलप्रभा नदि घाटाचा विकास, भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे खाजगीकरण करुन लैला शूगर्स कडून चालना, असोगा मार्गावरील मलप्रभा नदिवर बंधारा, गावागावात मंदिराचा विकास, रस्ते,पाणी योजना शिवाय दिमाखने उभारलेला खानापूरचा बंधारासह अनेक कामे राबवण्यात त्यानी इतिहास रचला.
खानापूरात तालुक्यातील झाडनावगा येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बालपणापासूनच सार्वजनिकव्यक्तीने जीवनात चढउताराला तोंड देत मोठ्या प्रतिकूल परिरस्थितीने जीवनाची वाटचाल, अपुर्‍या शिक्षणामुळे शेतीबरोबरच लहानसहान उद्योग करण्याकडे लक्ष घालून व्यवसायात यशाचा मार्ग शोधला व मनात जिद्द बाळगून तालुक्याच्या राजकीय पटलावर वाटचाल सूरु केली.
1992-93 मध्ये चापगांव मंडळ पंचायतीवर आल्यानंतर राजकीय वाटचाल करत 1995 साली हेब्बाळ विभागाचा ता. पं. सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. राजकीय मार्ग बदलण्याचा निर्णय घेऊन भारतीय जनतापक्षात प्रवेश केला. भाजपाने पक्षाने 1999, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतरहि जिद्द सोडली नाहि. त्या दहावर्षाच्या काळात तालुक्यात दौरे काढून जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्नहि केला.
2008 मध्ये आमदारकीची यशस्वी वाटचाल
त्यानी मागील 10 वर्षात तालुक्यात मोठा जनसंपर्क साधून स्वातंत्र्यानंतर भाजपाचा पाfहला आमदार म्हणून मान मिळवला. व आपल्या कर्तबदारीतून व कार्याच्या बळावर 2008 साली विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्व प्रथम भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचाच प्रश्न हाती घेऊन केवळ सहा महिन्याच्या कालावधीतच हा कारखाना एका खासगी कंपनीला भाडेत्वावर देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले . आणि मागील दहा ते बारा वर्षात लैला शुगर्स कंपनीने हा कारखाना अगदी व्यवस्थित चालविला व आता तो पिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपने तो आपल्या ताब्यात घेऊन खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा या लैला शुगर कारखान्याची यशस्वी धुरा सांभाळली आहे
खानापूर तालुक्यात आपल्या आमदारकीच्या काळात न भूतो न भविष्यती असा पाच वर्षात तब्बल 450 कोठीचा निधी आणून अनेक कामे मार्गी लावण्यात त्यानी यश मिळवले आहे. तालुका जंगल संपत्तीने व्यापलेल्या तसेच अनेक गावांना शासकीय सुविधा पासून वंचित असलेल्या खेड्यापाड्यांना पक्का रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय शाळांची सोय अंगणवाडी सारख्या अनेक मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला विशेष म्हणजे मराठी शाळांमध्ये अतिथी शिक्षकांची नेमणूक करून कर्नाटक सरकारलाही सीमा भागातील मराठी शाळांच्या कडे लक्ष वेधण्यास भाग पाडले हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतरहि त्यानी आपले कार्य कधीच थांबवले नाहीत खानापूर तालुक्यात मलप्रभा नदीवर होणाऱ्या कळसा- भांदुरा प्रकल्पाला प्रकल्पाचा ही खानापुर तालुका उपयोग व्हावा यासाठी अनेक ठिकाणी बंधाऱ्यासाठी प्रस्ताव ठेवला असोगा येथील पूलवजा बंधार्‍याचे काम पूर्णत्वाला आणले तसेच कळसा पांडुरंगा योजनेतून पहिल्या टप्प्यात खानापूरच्या जुन्या पुलाजवळ पूल वजा बंधाऱ्याची निर्मिती केली तसेच मळवी व तोराळी येथे मलप्रभा नदीवर पूलवजा बंधारे मंजूर करून आणले. शिवाय खानापूरचा मलप्रभा नदी घाट हा खानापूर शहराच्या इतिहासात अविस्मरणीय विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे
कै प्रल्हाद रेमाणी हे कटटर धार्मीक वृतीचे होते. लहान पणापासून ते दखःनचा राजा श्री जोतीबाचे भक्त होते. गावात त्यानी भव्य असे जोतीबाचे मंदिरहि बांधले आहे. त्यानी आपल्या उभ्या आयूष्यात देशविदेशातील धार्तीक स्थळांना भटी दिल्या आहेत. राजकीय कार्यकाळात 30 वर्षात त्यानी दरवर्षी श्रावण प्रवास कधीही चुकवला नाही खेड्यापाड्यातील दिन दलित गरिबांना सोबत घेऊन देशातील अनेक तीर्थस्थळांचा लाभ मिळवून देण्यास त्यांनी कायम आदर्श ठेवला त्याची आजही आठवण आम्हाला वंदनीय आहे
आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतरहि त्यानी आपले कार्य कधीच थांबवले नव्हते
पण क्रृर काळाने त्यांच्या आजाराला घेरले. अन असा हा विकासाचा महामैरु नेता आपल्यातून दुरावल्याने तालुक्याची मोठी हानी झाली आहे त्यांचे जाणे हे केवळ रेमानी परिवाराला एवढेच दुःखद नाही मात्र खानापूर तालुक्यात भाजपच्या पक्ष बांधणीसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी आपले जीवन पणाला लावले आणि खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची मशाल पेटवली 2018 मध्ये त्यांच्या जाण्याने खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी आजही भरून येणे शक्य नाही देह रूपाने ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कर्तुत्वाची जाण सर्वसामान्य राहिले आहे त्यांची स्मृती सतत डोळयासमोर रहाणार्‍या त्यांच्या पवित्र आत्म्यास पाचव्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us