Khanapur:
खानापूर तालुका आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन खानापुरात रविवारी करण्यात आले. बेळगाव -पणजी शहरांतर्गत महामार्गावरील वर्धे कॉम्प्लेक्स मध्ये सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना खानापूर तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष भैरू पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात आम आदमी पार्टीची संघटना 2011 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. परंतु संघटनेच्या बळकटीच्या दृष्टिकोनातून हवे तसे प्रयत्न झाले नाहीत. पण आता खानापूर तालुक्यात पक्ष संघटना मजबूत झाले असून हजारो कार्यकर्ते या संघटनेमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या पाच वर्षात तालुक्यातील काही ज्वलंत समस्या दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने अनेक कामे हाती घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, लबीब शेख, मोहन मुळीक,मंजुनाथ बागेवाडी,रमेश कौदलकर, कऱ्याप्पा बेकिंकेरी सह विभागीय प्रमुख व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.