2025_08_15_23_16_18_086

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र थाटामाटात साजरा करण्यात आला. चापगाव येथील ग्रामपंचायत तथा मलप्रभा हायस्कूल व मराठी व कन्नड शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूल मध्ये ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रतिमांचे पूजन बाजीराव पाटील, परशराम पाटील, पांडुरंग पाटील, माजी सभापती सयाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले तर ध्वजपूजन ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व शाळा कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, चापगाव पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण गोदी, निवृत्त सैनिक व कदंबा डेपोतील निवृत्त अधिकारी नारायण कुऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितयांचे स्वागत मुख्याध्यापक पी बी पाटील यांनी केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत तसेच देशभक्तीपर गीते सादर केले. प्रास्ताविक सहशिक्षक नंद्याळकर तर आभार तुकाराम सनदी यांनी मांडले.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्ष गंगुबाई कुरबर, उपाध्यक्ष मालुबाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे, सूर्याजी पाटील, नजीर सनदी , सदस्या स्नेहल पाटील, देमवा मादार आदींच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन व ध्वज पूजन करण्यात आले. यावेळी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश धबाले, बाजीराव पाटील, परशराम पाटील, पांडुरंग पाटील, अभी पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, दलित नेते हनुमंत मादार यासह पंचायत कर्मचारी उपस्थित होते उपस्थित्यांचे स्वागत ग्रंथपाल पिराजी कुराडे यांनी केले. येथील मराठी व कन्नड प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण व ध्वज पूजन शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मष्णू चोपडे, केशव घारशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दोन्ही शाळा कमिटीचे सदस्य सदस्य दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us