
खानापूर: शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगुरवाडी येथील श्री सातेरी माऊली व ग्रामदेवता श्री हुडगम्मा देवीचा यात्रोत्सव तब्बल 21 वर्षानंतर येत्या मंगळवार दि. 4 फेब्रुवारी ते बुधवार दि. 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तब्बल 21 वर्षानंतर भरवण्यात येणाऱ्या या उत्सवाची जय्यत तयारी ग्रामस्थातून आयोजिली जात असून यात्रो पूर्वीचे क** वार व धार्मिक विधी हाती घेण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी गावात गाराना घालून धार्मिक विधीना प्रारंभ करण्यात आला आहे.

यानुसार येत्या मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी मंदिरासमोर धार्मिक विधी होणार आहेत. बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी12 ते 3 या वेळेत श्री सातेरी माऊली मंदिर जवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.6 फेब्रुवारी रोजी हुडगांमादेवी यात्रेला सुरुवात होणार आहे. शुक्रवार दी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत हुडगम्मा देवी जवळ सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता मरेवा देवी गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता सैतानी पास हा नाटक शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी रामराज हा नाट्य खेळ होणार आहे. तर शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दौंड तालुक्यातील कांजळगाव च्या हभप सोनाली ताई फडके यांचा कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता उज्वल हिड्स कोल्हापूर यांचा आर्केस्ट्रा , सोमवार दि. 10 रोजी रात्री दहा वाजता खुल्या रेकॉर्ड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी खुल्या गटात अनुक्रमे 33000,15000,7000 तर 12 वर्षांपुढील गटासाठी अनुक्रमे 13000, 15,000, 7000 व बारा वर्षा खालील गटासाठी 11000,7000,3000 एक अशी बक्षीस हे ठेवण्यात आले असून इच्छुकांनी 8 फेब्रुवारी पूर्वी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.