
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या विद्युत पंपसेटच्या केबल चोरण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. चापगाव- यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीच्या दुतर्फा असलेल्या अनेक पंपशेठच्या केबल चोरत असताना सतर्क शेतकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे तेथेच केबल टाकून त्या चोरट्याने पोबारा केल्याचा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला.

नदीच्या काठावर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेकडो पंपसेट आहेत. परंतु या पंपसेटच्या केबल किंवा मोटर चोरीचे प्रकार अनेक वेळा घडत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. सहा महिन्यापूर्वी येथील नामदेव कुराडे यांची मोटर चोरीला गेली होती. तर अनेक वेळा केबल चोरीही गेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीची नेहमीची गस्त ठेवली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास बंधाऱ्याजवळील शेतकऱ्याची मोटर केबल तोडून गोळा करून ठेवल्याचे निदर्शनाला शेतकऱ्याला आले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मोटर केबलची पाहणी केली असता त्याही मोटरची केबल तोडून ठेवली होती. तातडीने बाजूच्या शेतकऱ्यांना अलर्ट करण्यात आले. बघता बघता 15 ते 20 मोटर केबल त्या ठिकाणी तोडून त्या चोरट्याने एका बाजूने आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यात यडोगा ,चापगाव येथील अनेक शेतकरी जमा झाले व त्या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सुगावा लागतात त्या चोरट्याने तेथून पोबारा किल्ल्याचे समजते.