चापगाव /प्रतिनिधी : वड्डे बैल तालुका खानापूर येथील श्री रामलिंगेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने उद्या सोमवार दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कुस्ती मैदानात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी पैलवान बंधूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
मलप्रभा नदी काठावर असलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थान मध्ये दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवारी महापूजा भजन कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी नवसफेड व दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ सार्वजनिकानी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.