IMG-20240205-WA0018
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी एप्रिल महिन्यामध्ये कुस्ती आखाडे भरवण्याची परंपरा आहे परंतु यावर्षी लोकसभेची निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही यासाठी पुढील महिन्यात म्हणजे मार्च अखेर खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कुस्ती दंगल (आखाडा) भरवण्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे होते.
  • प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत संघटनेचे सचिव शंकर पाटील यांनी केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आखाडा आपली मते व्यक्त केली. मागील वर्षीच्या आखाडाचा झालेला आराखडा आणि या वर्षीच्या आखाड्यात कशा पद्धतीने सुधारणा करण्यात यावी याबद्दलही बैठकीत चर्चा झाली तसेच यावर्षीच्या आखाड्यात नामवंत पैलवानांना प्राचारण करून निकाली कुस्त्यांचे मैदान करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यासाठी आवश्यक आर्थिक निधी उभा करणे तसेच नामवंत पैलवारांना प्रचार करून खानापूर तालुक्यातील कुस्ती शौकिनांना एक चांगले मैदान देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया असे विचार मांडले या बैठकीला संघटनेचे माजी अध्यक्ष पांडुरंग पाटील, माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ, माजी तालुका पंचायत सदस लक्ष्मण झांजरे, अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत गुरव, पैलवान यशवंत अल्लोळकर, सदानंद होसुरकर, अर्जुन देसाई राजाराम गुरव मेंडेगाळी आदींनी विचार मांडले. बैठकीला मोदीन दावणगिरी, भाऊराव पाटील, भंडरगाळी, निळकंठ पाटील भंडरगाळी, नागाप्पा पाटील उंचवडे, राजाराम पाटील खानापूर, विठ्ठल अडकुडकर लक्ष्मण पाटील आसोगा आधी उपस्थित होते. सर्वांचे आभार प्रदर्शन प्रकाश मजगावि तीर्थकुंडे यांनी आभार मानले
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us