
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने येत्या रविवार दि. 18 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता खानापूर तालुका मलप्रभा क्रीडांगणावर भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या आकड्याच्या जयत तयारीला वेग आला असून गेल्या दोन-तीन दिवसापासून खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी आखाडा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध भारत केसरी पै. सोनू कुमार हरियाणा यांच्या लढत होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. शुभम सिद्धनाळे विरुद्ध हिमाचल केसरी पवन कुमार यांच्यात होईल. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे यांच्यात होईल . याप्रमाणे 46 हुन अधिक नामांकित पैलवानांच्या कुस्त्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन जेडीएस नेते नासिर बागवान यांच्या हस्ते होणार म्हणून आखाड्याचे पूजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होईल. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत. आखाड्यात हनुमान प्रतिमेचे पूजन भाजप नेते प्रमोद कोचेरी, छत्रपती शिवरायांचे प्रतिमेचे पूजन लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला राजकीय कार्यदर्शी सचिव शंकरगौडा पाटील, महलासा स्टोन क्रशर चे मालक रमेश नाईक, भूषण काकतकर, प्रकाश पाटील , शाहू राऊत , प्रमोद कदम असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील कुस्ती शौकीन यांनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गुरव, माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मलप्रभा क्रीडांगणावर जय्यत तयारी!

तालुका मलप्रभा क्रीडांगणावर कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ठीक तीन वाजता कुस्ती मैदानाला सुरुवात होणार आहे अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. हा आखाडा यशस्व करण्यासाठी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुभेदार हनुमंत गुरव, उपाध्यक्ष रुद्राप्पा हंडोरी, कार्याध्यक्ष राजाराम गुरव , खजिनदार लक्ष्मण झांजरे, सेक्रेटरी सदानंद होसुरकर, माजी अध्यक्ष सदस्य लक्ष्मण बामणे, पांडुरंग पाटील, यशवंत अल्लोळकर , प्रकाश मजगामी, जयवंत खानापूरकर , शंकर पाटील, रामचंद्र पाटील , नागाप्पा पाटील, मोदींन दावणगिरी , अर्जुन जांबोटी, सुरेश द. पाटील, राजाराम पाटील, अमोल बेळगावकर, अर्जुन देसाई असे अनेक पदाधिकारी कार्यशील आहेत.
