खानापूर:
खानापूर तालुका फोटोग्राफर व व्हीडीओग्राफर वेलफेअर असोसिशनच्यावतीने सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० वाजता जागतिक फोटोग्राफर डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बिलकी अवरोळी मठाचे स्वामीजी चन्नबसव स्वामी यांच्या सान्निध्यात होणार्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव संजय करंबळकर उपस्थित राहतील.
तर प्रमुख पाहुणे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, पोलिस इन्स्पेक्टर मजुनाथ नाईक, सुनिल मुडलगी प्रसिडेट खानापूर तालुका फोटोग्राफार असोसिएशन,पिराजी कुराडे अध्यक्ष पत्रकार संघटना खानापूर व इतर पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.