खानापूर /प्रतिनिधी:
आधुनिक युगात तंत्रज्ञान कॅमेरे उपलब्ध झाले आहेत 185 वर्षांपूर्वी फ्रेंच सरकारने याचा अविष्काराची घोषणा केली म्हणून याला प्रसिद्ध मिळाले त्या दिवसापासून जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो फोटोग्राफी हा दिन छंद म्हणून तर लोकांना फोटोग्राफी कडे आकर्षण करणे आपल्या कौशल्याची प्रेरणा देणे यासाठी केला पाहिजे. अशी विचार खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
सोमवारी खानापूर तालुका फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा केला. येथील शिवस्मारकात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तालुका फोटोग्राफर असोसिएशन सेक्रेटरी संजय कम्बळकर होते. पूजश्री चन्नबसव स्वामी आवरोळी मठ यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाइक,भाजप नेते व लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील, संदेश क्रांती न्यजचे संपादक सुहास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मूडलगी, दिपक गुरव, संजय मांजरेकर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर बोलताना भाजप नेते सदानंद पाटील म्हणाले, फोटोग्राफर हा समाजातील एक केंद्रबिंदू आहे. पूर्वीच्या फोटोग्राफी व अलीकडच्या काळातील सुधारित फोटोग्राफी मध्ये बरेच फरक आहेत. त्यामुळे फोटोग्राफर्सने आपल्या व्यवसायात पारंगतता आणत आधुनिकतेची कास धरावी असे त्यांनी सुचित केले.
व्यासपीठावरून आशीर्वाचन पर बोलताना परमपूज्य चनंबसव स्वामी यानी मार्गदर्शन केले. संघटनात्मक काम यामध्ये बरेच दिवस अवलंबून असते. फोटोग्राफी ही एक जादू आहे. मौलवान छंद साठवून ठेवण्याची ही एक कला आहे. ती जतन करून ठेवा असे त्यांनी सूचित करून मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावरून फोटोग्राफर माणिक कोटे त्यांनी संघटनेची जबाबदारी व फोटोग्राफरसांची जबाबदारी याबद्दल मारदर्शन करून व्यवसायातील उतरती ही आपली हार नसून या कठीण काळात ती तारण्याचे सामर्थ फोटोग्राफरने ठेवून जीवनामध्ये उत्तम फोटोग्राफर बनण्यासाठी प्रयत्न करावेत संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटो वापरला शासकीय सुविधा व अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी तालुका फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर संघटना कार्य तत्पर राहील असे त्यांनी सुचित केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय करंबळकर यांनीही संघटना ही प्रत्येकाच्या मनातील व आपसातील दुवा व चांगले संबंध साधणारी आहे. यासाठी प्रत्येक फोटोग्राफर्सनी या संघटनेत सहभागी होऊन अडीअडचणीच्या काळात तसेच समृद्धीच्या काळातही एकसंघ राहून कार्य करावे अशी त्यांनी सुचित केले. कार्यक्रमात प्रस्तावना शिवानंद बागवाडकर यांनी करून फोटो संघटने विषयी मार्गदर्शन करत प्रस्तावना केली शेवटी फोटोग्राफर आप्पाजी पाटील यांनी आभार मानले