प्रतिनिधी :गर्लगुंजी
आपला भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात महिला व पुरुष दोघांना बरोबरीचे स्थान आहे.पण काही भागात ग्रामीण भागात आजही स्त्रियांवर अत्याचार केला जातो. तो थांबवण्यासाठी स्त्री ने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे. स्त्रियांचे सशक्तीकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास ! महिला सशक्तिकरण ” स्त्री घर आणि काम किंवा नोकरी अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत असते. त्या दरम्यान तिच्यावर अनेक अत्याचार होतात व अनेक समस्यांना सुद्धा तिला तोंड द्यावे लागते. आजच्या स्त्रिया ह्या पहिल्या सारख्या आबला राहिल्या नाहीत. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहे. तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने महिलांना पाहिजे तेवढा योग्य तो मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे आणि त्या साठी स्त्री सशक्तीकरण करणे अत्यंत गरजेचे बाब आहे. प्रत्येक स्त्री ही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र असली पाहिजे. असे सांगून आपणही ग्रामीण पातळीवर महिलांच्या समस्या संदर्भात अज्ञान नाही तळागाळातील लोकांच्यापर्यंत काम करत आपणही समाजाच्या सेवेत उतरलो आहे तुमच्या आशीर्वादाने आगामी काळात या खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर महिलांचे सशक्तिकरण व सरकारी योजना राबवण्यासाठी तुमचा आशीर्वाद आगामी काळात आमच्या पाठीशी असावा. करिता आगामी राजकीय प्रवाहात स्त्रियांनी स्वतःला वाहून घेऊन भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. रविवारी गर्लगुंजी येथे राष्ट्रीय महिला दिन व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपा महिला उपाध्यक्ष मैत्रीण संघटनेच्या संस्थापिका श्रीमती निकिताताई केळकर, सांगली -मिरज महानगरपालिकेचे महापौर व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या (भाजप) श्रीमती संगीताताई खोत, श्रीमती रुक्मिणी विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीमती वंदना पाटील, ग्रामपंचायत सदस्या ललिता कोलकार, सविता बुरुड, रेखा कुंभार, अनुराधा निटूरकर, सविता सुतार व गावातील महिला वर्ग हजारो संख्येने उपस्थित होते.
नारी शक्ती ही जगाला तारणारी शक्ती
यावेळी गोवा राज्य भाजपा प्रभारी निकिताताई केळकर म्हणाल्या महिलांचे सबलीकरण व महिलांचा शारीरिक दृष्ट्या विकास ही काळाची गरज बनली आहे महिलांनी आता मागे राहून चालणार नाही. कायद्याच्या चौकटीतही अनेक हक्क महिलांना देण्यात आले आहेत. 50 टक्के आरक्षणातून महिलांनी जगताना आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवावा महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले सारख्या महान शिक्षण महर्षीनी महिलांना जगण्याचा आणि समाजाला जगवण्याचा हक्क व ज्ञान दिले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सक्षम बनावे असे आवाहन केले. यावेळी सांगलीच्या महापौर सौ. संगीताताई खोत यांनीही महिलांना उत्तम मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमात श्रीमान विठ्ठल हलगेकर व त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला सबलीकरणासंदर्भात अनेक महिला प्रतिनिधी व उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.गर्लगुंजी गावासह परिसरातील अनेक महिला भगिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर प्रास्ताविक स्वागत कदम मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमाला गावातील जवळपास 80 हून अधिक महिला स्व सहाय संघ तसेच धर्मस्थळ संघाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.