Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर: तालुक्यातील चापगाव येथील सौ. प्रिया प्रवीण उर्फ राजू बेळगावकर यांना शेतातील काम करत असताना पायाला सर्पदंश झाला. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी मोठा खर्च उभा राहिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडे आर्थिक मदतीची विनंती केली होती.
या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सदस्य Channaraj Hattiholi यांनी तातडीने आर्थिक मदत देत कुटुंबाला दिलासा दिला. त्यांच्या या मदतीमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.
या मदतीसाठी निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील यांनी पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच काँग्रेस नेते शिवराम बेळगावकर, सुभाष बेळगावकर आणि विठ्ठल बेळगावकर यांनीही सहकार्य करत आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचे आभार मानले.
दरम्यान, सौ. प्रिया बेळगावकर यांच्यावर के.एल.ई. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us