Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : आम्ही जे काम हातात घेतो ते तडीस नेतो ( शहरांतर्गत रोडचा सर्वे, नकाशा, मार्किंग व अतिक्रमण हे काम मार्गी ) खानापूर शहरांतर्गत असणारा महामार्ग रुंदी करण्यासाठी तसेच अतिक्रमण जागेसह सरकारी तालुका पंचायत असो अथवा नगरपंचायतीचे गाळे असोत पारदर्शक प्रक्रिया राबवून खानापूर शहराच्या सौंदर्य साठी आम्ही सतत राहू आता शहरांतर्गत दुतर्फा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालीच आहे आता पुढील काम म्हणजे सरकारी गळ्यांची लिलाव टेंडर प्रक्रिया राबवून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया हाती घेण्यासाठी आपले प्रयत्न राहतील यासाठी जनतेचे सहकार्य ही अत्यंत महत्त्वाचे असल्याच्या खुलासा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

खानापूर शहरातील मालमत्तेवर अतिक्रमणा विरोधात पत्रकार दिनकर मरगळे व विवेक गिरी यांनी उपोषण सुरू केले. त्या उपोषणापासून आजपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसची सर्व मंडळी सातत्याने कार्यशील राहिले प्रारंभीच्या काळात यामध्ये अडथळा आणण्याचा व सरकारी यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्ही ब्लॉक काँग्रेसने या प्रकरणी जातीने लक्ष घालून हा किल्ला लढवला आणि सर्वे चे काम पूर्ण केले. नकाशा सुद्धा तयार झाला व नंतर मार्किंग सुद्धा आम्ही करून घेतले. आता शिवस्मारक चौक ते कोर्ट इथपर्यंत चा सर्व्हे पूर्ण झाला आहे पुढील टप्प्यात शिवस्मारक चौकापासून फिश मार्केटकडीस सर्वे हातात घेण्यात येईल असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

मार्किंग चे काम झाले व आता अतिक्रमण सुद्धा हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे पट्टन पंचायत तहसिलदार साहेब पोलीस प्रशासन पीडब्लूडी वगैरे सर्वांनीच हातभार लावला आहे. या सर्व कामात खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी प्रशासनास योग्य ते करा हा संदेश दिला होता त्याप्रमाणे प्रशासन हालले व रिझल्ट लोकांच्या समोर आहे.

पुढील टप्प्यात सरकारी गाड्यांच्या लिलाव प्रक्रियेकडे लक्ष!

आता पुढील टप्पा म्हणजे तालुक्यात जे जे सरकारी गाळे आहेत जे कित्तेक वर्षापासून त्या त्या लोकांकडेच आहेत ज्यांची मुदत संपून सुद्धा टीपी व पट्टन पंचायत गप्प आहे अशा सर्व गाळ्यांचा लिलाव हा टेंडर प्रकियेनुसारच झाला पाहीजे यासाठी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस प्राधान्याने काम करेल.
टेंडर प्रक्रिया राबविली तरच लोकांना निरपेक्ष पणे गाळे मिळू शकतील नाहीतर परत दादागिरी व प्रशासनावर दबाब टाकून गाळे घेतले जातील व सामान्य लोकांना गाळे मिळणार नाहीत सामान्य लोकांवर अन्याय होईल म्हणून खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस ची मागणी आहै सर्वच्या सर्व गा़्ळ्यांचा लिलाव हा टेंडर प्रक्रियेनुसार करावा. जसा बस स्टॅंड मधील गाळ्यांचा केला आहे. तालुका पंचायत तथा नगरपंचायतने जे काय डिपोजिट घेतले असेल ते रितसर परत करावे. व पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवावी.
यासंदर्भात जर काही चुकीचे केले गेले तर मात्र खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस गप्प बसणार नाही याची नोंद प्रशासनाने वेळीच घ्यावी. जर काय चुकीची प्रक्रिया राबविली गेली तर आम्ही लोकायुक्त व माननीय न्यायालयामार्फत योग्य त्या गोष्टी नक्की करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असेही त्यांनी सुचित केले आहे.
सरकारी गाळे वाटप सुयोग्य व पारदर्शकपणे पार पाडा ही प्रशासनांस विनंती. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावास बळी पडू नये.
खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस जनतेच्या सोबत आहे. असे या पत्रकात नमूद केले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us