Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील युवा कीर्तनकार व टीव्ही फेम कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील महाराज किर्तन यांना महाराष्ट्रातील आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी कीर्तन सेवेचा लाभ मिळाला आहे. येत्या 10 ऑक्टोंबर रोजी रात्री सहा ते रात्री आठ या वेळेत त्यांचे कीर्तन होणार आहे. श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचा सप्त शतकीप्तर सुवर्ण महोत्सव 750 वा सोहळा आज 8 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे.

सदर सोहळा 12 तारखेपर्यंत चालणार आहे. यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांची सेवा प्रवचन भजन ठेवण्यात आले आहे. खरंतर ज्ञानेश्वर माऊली आळंदी या ठिकाणी ही सेवा मिळणे भाग्याचे लागते. आजवर कर्नाटकातून यापूर्वी केवळ एक व्यक्तीला हा कीर्तनाचा लाभ मिळाला होता असे सांगतात. तद नंतर संपूर्ण कर्नाटकातून युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज कीरहलशी यांना या किर्तन सेवेचा लाभ मिळाला आहे. युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांनी अलीकडे आपल्या अल्प वयातच एक उत्तम कीर्तनकार म्हणून नाव कमावले आहे. सध्या परिस्थितीत बेळगाव जिल्ह्यामध्ये एक नामांकित युवा कीर्तनकार म्हणून त्यांची अलीकडे ख्याती होत आहे. कीर्तनातून भक्तीरसाची, सामाजिक सेवेची तथा प्रबोधनाची कास धरून ते कीर्तन करत आहेत त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. यापूर्वी त्यांनी सुप्रसिद्ध टीव्ही चॅनल ” शेराव मराठी” ” फक्त मराठी” अशा चैनल मधून त्यांनी स्पर्धात्मक किर्तन सेवेत सहभाग घेतला आहे त्यामुळे त्यांची ख्याती झाली आहे. अशा या युवा कीर्तनकार यांच्या आळंदी येथील किर्तन सेवेला शुभेच्छा तथा तालुक्यातील जे वारकरी भाविक या काळात आळंदी या ठिकाणी दर्शनासाठी जातील त्यांनी तेथे उपस्थिती लावून या सेवेचा लाभ घ्यावा अशी आवाहन वारकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
