खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सरकार मार्फत शाळांना गणवेश, पुस्तक, बॅग, मध्यान आहार, मोफत शिक्षण देत आहे. तरीही पालक खाजगी शाळांना पाठवत आहेत. गरीबी व्यक्ती खाजगी शाळांना आपली मुले पाठवून अडचण निर्माण करत आहेत तर दुसरीकडे सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी शाळा जगली तर मातृभाषा जगेल याचे भान प्रत्येक नागरिकांनी ठेवून आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शाळांमध्येच शिक्षित केले पाहिजे. सर्व जाती धर्माचा आदर ठेवून सर्वांनी एक विचार करून आपली मातृभाषा कुठलीही असो, भारत देशाच्या 22 प्रमुख मातृभाषा आहेत, त्या टिकल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत आणि सरकारी शाळा जपल्या पाहिजेत. शिवाय भारतीय संस्कृतीतील कला ,क्रीडा, शिक्षण ,खेळ, योग ,व्यायाम विविध प्रकारच्या शैक्षणिक स्पर्धा आणि संस्कृती जपायची असेल तर आपली मातृभाषेची सरकारी शाळा जपली पाहिजे टिकली पाहिजे . असे भावनिक आवाहन विश्वभारती क्रीडा कला संस्थेचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी व्यक्त केले. तालुका विश्वभारती क्रीडा कला संस्थेच्या वतीने सोमवारी खानापूर येथील शिवस्मारकात शाळा वाचवा भाषा जगवा अभियान तसेच मातृभाषेतील आदर्श शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जांबोटी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर, तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा , तालुका अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चीगुळकर , यांसह एस एस परब सर ,सौ. कल्पना गाडगीळ, सौ भाग्यश्री कुंभार, जमादार सर, संघटनेचे प्रमुख दामोदर कणबरकर, विनोद गुरव , भैरव पाटील, शिक्षण प्रेमी, महिला, आजी-माजी शिक्षक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संघटनेचे प्रमुख महादेव पाटील हे होते.
कार्यक्रमात मुलींच्या इशस्तवन व स्वागत गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. व त्यानंतर खानापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि लहान मुलांचा सन्मान करण्यात आला. मराठी मातृभाषेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन, विज्ञान शाखेतून मराठा मंडळ कॉलेजला प्रथम आलेल्या कु. विवेक कृष्णा खांडेकर याचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित एस डी एम सी कमिटी सदस्य व अध्यक्ष, आदर्श शिक्षक उपस्थित शिक्षक यांचा विशेष मानसन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या अभियानाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री कृष्णा जयवंत खांडेकर यांचाही मानसन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरून जांबोटी सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगावकर, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक पीटर डिसोजा आदींनी विश्वभारती क्रीडा कला संस्थेच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मष्णु चोपडे यांनी केले व आभार प्रदर्शन दत्ता पाटील व यल्लाप्पा सुतार यांनी केले.
क्रीडा भारती आदर्श शिक्षक पुरस्काराने मातृभाषेतील शिक्षकांचा सन्मान!
कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, नंदगड शाळेतील सहशिक्षिका कल्पना गाडगीळ, चिखले शाळेचे मुख्याध्यापक एस एस मुला, चेन्नई वाडी शाळेचे शारीरिक शिक्षक किरण पाटील आळशी वाडीचे मुख्याध्यापक किरण जाधव चापगाव हायस्कूलचे मराठी विषयाचे शिक्षक तुकाराम सनदी, शिक्षिका मालवी शिक्षक विठ्ठल पाटील शिक्षिका भाग्यश्री कुंभार एस एस परब कमलाकर पाटील, दत्तात्रय देसाई, तमन्ना गुरव, गंगाधर गुरव मनोहर हुंदरे आधी विविध शाळांतील शिक्षकांचा श्रीफळ शहर व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.