खानापूर : तालुक्यातील कारलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक, खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली , अध्यक्षपदी विष्णू गणपती काद्रोळकर तर उपाध्यक्षपदी सुशांत धाको घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उभयतांची निवड झाल्यानंतर माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कारलगा पिके पी एस संघाचे संचालक, रणजीत गोपाळ पवार, हनमंत तुकाराम कामती, नारायण जीवाप्पा सनदी, पार्वती प्रभाकर काद्रोळकर, मोहन मारुती मादार, दिगंबर अंकुश गणाचारी, सुनील सुभाष पाटील, रामभाऊ कल्लाप्पा पाटील, पुष्पा पुंडलिक आळवणी हे संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.