
खानापूर : तालुक्यातील विविध जोड रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ उद्या शुक्रवार दि. 2 मे रोजी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. अल्पसंख्यांक निधी तसेच 50 – 54 योजनेअंतर्गत 6 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये खानापूर शहरातील अल्पसंख्यांक वसाहती मधील रस्ते व इतर कामांचा शुभारंभ सकाळी 11 वाजता होणार असून याकरता 3 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. त्याच प्रमाणे 50 – 54 योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्याचे विकासासाठी रूमेवाडी गावच्या लिंक रोड साठी 40 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ सकाळी 11.30 वाजता होणार आहे. त्याच प्रमाणे दुपारी 12 वाजता इदलहोंड- माळ अंकले लिंक रोड पूजा कार्यक्रम, दुपारी 12.30 वाजता गर्लगुंजी ते नंदीहळी (खानापूर तालुका हद्दीतील रस्त्याचे) डांबरीकरणसाठी 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे बरगाव ते गर्लगुजी – तोपीनकट्टी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 30 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व त्या भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.