IMG-20230611-WA0189


बेळगाव : जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवा प्रदूषण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. सजीव, निर्जीव म्हणजेच हवा, पाणी,झाडेझुडपे या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते. यास्तव पृथ्वीचे देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे. निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय .पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे असे प्रतिपादन भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.

प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस उत्तीर्ण झालेल्या श्रुती यरगट्टी, निवृत्त प्राचार्य डॉ डीएन मिसाळे, अध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील सचिव प्रा. विक्रम एल पाटील, प्रा. निलेश शिंदे, प्रा अमित सुब्रमण्यम, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. डॉ. डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ आर डी शेलार प्राचार्य आनंद पाटील प्राचार्य डॉ. बसवराज कोळूचे व्यासपीठावर उपस्थित होते; मान्यवरांच्या हस्ते विविध झाडे लावण्यात आली.महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विविध झाडे लावून त्यांना पाणी घालण्यात आले. झाडांचे महत्त्व पटवून त्याची संवर्धन कसे होईल याची माहिती देण्यात आली.

स्वागत प्रा. डॉ. एम. एस. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शुभम चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप वाडेकर व सुनिल ताटे यांनी केले. आभार प्रा. महादेव नार्वेकर यांनी मानले.

यावेळी प्रा. अमित चिंगळी, प्रा. नारायण तोराळकर, प्रा सुरज पाटील, प्रा. बी. आय. वसुलकर, प्रा. निता पाटील, प्रा. अनिता पाटील, राजाराम हलगेकर, प्रा. व्ही. वाय पाटील मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी कर्मचारी आणि समाजातील नामवंत मान्यवर मंडळी उपस्थित होते.



Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us