खानापूर /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील नेरसे क्रॉसवर दुचाकी व चार चाकी आपघात होऊन दुचाकीस्वाराचा उजवा पाय निकामी झाला.तर महिलेचा हात निकामी झाला. गंभीर झालेला दुचाकी स्वाराचे नाव लक्माणा चन्नापा हणबर (वय.६०) रा मुडगई (जांबोटी) तर महिलेचे नाव मलव्वा महेश गावडे (वय.४५) रा.जगलबेट अशी आहेत. तर एम.एच.०२ जे पी ८४७७ चारचाकी वाहनाची समोरील बाजू संपूर्ण खराब झाली आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून प्रथमदर्शनी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई म्हणाले की, दुचाकी स्वार हे अत्यंयात्रेसाठी येत होते. तर चारचाकी वाहन एम.एच.०२जे.पी.८४७७ हे गोव्याला जात होते. नेरसे क्रॉसवर वळण आहे. त्यामुळे दोन्ही वाहनधारकाा वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारचाकी वाहनाची मागुन जोराची धडक बसुन दुचाकी स्वार गंबीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अम्बूलन्स जागी हजर झाली. व गंबीर जखमीना खानापूर सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. प्राथमिक उपचार करून लागलीच बेळगावला पाठविण्यात आले. घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे