• खानापूर : रामनगर येथील पांढरी नदीत पोहण्यासाठी   गेलेल्या, दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली आहे. या दुर्घटनेत बुडून मृत्यूमुखी पावलेल्या दोन अल्पवयीन मुलांत हुबळी येथील मेहबूब मुबारक पठाण (वय11)  आणि चर्च गल्ली रामनगर येथील आफण असफाक खान ( वय 12) यांचा समावेश आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात कोसळला आहे.
  • याबाबत मिळालेली माहिती की, मुबारक हा, आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. मुबारक आणि आफण, हे रविवारी दुपारी साडेतीन च्या दरम्यान रामनगर येथील पांढरी नदीत, नार्वेकर ब्रिज च्या बाजूला पोहण्यासाठी गेले होतें. त्यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा, अंदाज, पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. घटनास्थळी सीपीआय चंद्रशेखर हरिहर, डी वाय एस पी शिवानंद यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.  रामनगर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवराज एन एम, यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us