खानापूर:
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणुक मंगळवारी दि.१७ रोजी पार पडली.
या निवडणुकीत अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवड ही १५ महिण्यासाठी असुन बीन विरोध करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष पदासाठी सौ.अनिता प्रताप मुरगोड यांची बीनविरोध तर उपाध्यक्ष पदासाठी पारव्वा हुडेद यांची निवड होताच.
इदलहोंड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य कृष्णा कुंभार यानी नुतन अध्यक्षा सौ अनिता प्रताप मुरगोड यांचा शाल,पुष्पहार घालुन अभिनंदन केले.
नुतन ग्राम पंचायत अध्यक्षा सौ अनिता प्रताप मुरगोड या सिंगीनकोप गावचे माजी सदस्य कृष्णा कुंभार यांच्या बहिण होत.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य मारूती गुरव,चन्नाप्पा गुरव,शिवाजी करंबळकर,लक्ष्मण तिरवीर,रघुनाथ फाटके, सदस्या सौ गीता हलगेकर,रेणूका सुरेश कोलकार,सौ.लक्ष्मी तिरवीर,सौ रेखा सुतार
तसेच पीडीओ राजाराम हलगेकर,सेक्रेटरी रघूनाथ देसाई, कर्मचारी संभाजी पाटील,भरमाणी पाटील,भालचंद्र तिरवीर,कृष्णा गुंजीकर,मारूती हुडेद,किरण पाटील,लक्ष्मण गुंजीकर,ग्रंथपाल श्रीमती मिनाक्षी मुरगोड,आशा कार्यकर्त्या लक्ष्मी पाटील आदी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.