
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: नुकताच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विरोधात भारतीय सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक व त्यांना प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जात आहे. यानुसार खानापूर शहरातही उद्या शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर तिरंगा यात्रा खानापूर येथील बसवेश्वर सर्कल पासून शिवस्मारक स्टेशन रोड, ज्ञानेश्वर मंदिर, बाजारपेठ चौराशी मंदिर कडे होऊन सांगता होणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील तमाम देशभक्तांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक भारताचा नागरिक म्हणून या तिरंगा यात्रेत बहुसंख्येने उपस्थित रहाव असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भारताचे जवान सैनिक यांना बल देण्यासाठी राष्ट्र सुरक्षेसाठी सकाळी साडेदहा वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील नागरिक, आजी, माजी सैनिक, संत वारकरी मंडळी, महिला भगिनी, विविध संघ संस्थेचे सभासद , तमाम खानापूरवाशी यांनी या रॅलीमध्ये भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तिरंगा यात्रा: तिरंगा यात्रा ही अशीच एक यात्रा आहे
ज्यामध्ये लोक भारताच्या राष्ट्रध्वजाचा तिरंगा घेऊन जातात. आजकाल तिरंगा यात्रा मोठ्या जोशात आणि उत्साहात सुरू आहे. तिरंगा यात्रा देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय प्रेमाने भरलेली आहे. तिरंगा घेऊन प्रवास केल्याने आपल्याला प्रत्येकामध्ये प्रेम आणि अभिमानाची भावना जाणवते. राष्ट्रीय एकता का संदेश आहे अववर सब में जोश आता है की हुम सब भार्टियो को देश सिद्धना है. तसेच, हा प्रवास आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या वीरांची आठवण करून देतो.
त्यांनी हर घर तिरंगा सारखी मोहीम राबवून प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आणि घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम केले आहे. प्रत्येक पिढी तिरंग्याशी जोडलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, तिरंगा केवळ एक ध्वज बनला नाही तर तो एक लोकचळवळ, प्रेरणा आणि अभिमानाची भावना बनला. अशा या तिरंगा यात्रेत सार्वजनिकानी पक्षीय राजकारण मतभेद बाजूला ठेवून एक देशभक्त म्हणून उपस्थित राहावे अशी आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.