IMG_20241127_064740

खानापूर: खानापूर तालुक्यातील मळव येथील रहिवासी व गावातील प्रमुख , पंचक्रोशीतील प्रमुख पंच नागापा दत्तू कदम व 71 यांचे आज सकाळी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्याबद्दल दोन कर्ते चिरंजीव, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार सकाळी 11.30 वाजता होणार आहे. ते खानापूर मळव येथील पत्रकार महेश कदम यांचे वडील होत.

मळव (ता. खानापूर) येथील पत्रकार महेश कदम यांचे वडील, महारष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रतिष्ठित नागरिक.कै.नागाप्पा दत्तू कदम हे पंचक्रोशीतील प्रमुख पंच म्हणून ते सर्वश्रुत होते. विवीध संघ संस्थते सल्लागार होते. पंचक्रोशीतील विवीध मंदिर बांधकाम कमिट्या तसेच वार्षिक यात्रोत्सवात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
पूर्वी कोणतेही वाहन अथवा संपर्काचे साधन उपलब्ध नसलेल्या आपल्या दुर्गम भागांत स्वतः पहिल्यांदा दुचाकी व टेलिफोन घेऊन जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या. घनदाट अरण्य असल्याने रात्री अपरात्री घडलेले प्राण्यांचे हल्ले, अपघात यातील जखमींना तसेच महिला,वृद्ध अशा अनेक रुग्णांना पायवाटेवरून दुचाकीने खानापूर पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. यातून अनेकांचे प्राण वाचविन्याचे महान कार्य त्यांच्याकडून घडले आहे.
ग्रामीण भागातील मुलांनी सैन्यात जावे, यासाठी ते नेहमी धडपडत असत. याच प्रयत्नातून त्यानी आपला मोठा मुलगा विष्णू यास सैन्यात भरती केले. तसेच अनेक होतकरू तरुणांना देखिल आर्थिक मदत केली. त्यामुळे भागतील अनेजण नोकरी आणि व्यवसायात आहेत. गोर गरीब जनतेला सातत्याने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे अनेकांचे सांसर उभे राहीले आहेत.

शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गाव परिसरातील नागरिकांच्या समस्या, न्यायनिवाडा, देव देवकी, मरण-कारण, अगदी पारदर्शकपणे पार पाडले. अशा या दूरदृष्टी व थोर आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us