खानापूर : एखाद्या संस्थेच्या उभारणीत ज्येष्ठांचा सल्ला अधिक महत्त्वाचा असतो. तोपिनकट्टी गावात महालक्ष्मी ग्रुपचा वटवृक्ष निर्माण करण्यास अनेकांचा महत्त्वाचा सहभाग ठरला आहे. अशा मध्ये तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे विद्यमान संचालक व महालक्ष्मी ग्रुपचे जेष्ठ सल्लागार श्री गंगाराम गोविंद बांदिवडेकर यांचे गेल्या 26 नोव्हेंबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याला आज तेरा दिवस झाले. त्यांच्या जाण्याने बांदिवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गंगाराम बांदिवडेकर उर्फ आप्पा हे संघात जेष्ठ सल्लागार म्हणून नेहमी आदर्शवंत होते. गेल्या काही वर्षांपासून महालक्ष्मी प्राथमिक कृषी पतीन संघावर ते विद्यमान चेअरमन म्हणून तर गेले. अनेक वर्ष ते संचालक म्हणून काम करत होते. अशा या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
शोकाकुल: श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिन कट्टी संचलित श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी तोपिनकट्टी, श्री महालक्ष्मी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ तोपिनकट्टी, लैला शुगर प्रायव्हेट लिमिटेड खानापूर तसेच इतर फॉर्म संस्थेचे उपाध्यक्ष संचालक मंडळ कर्मचारी वर्ग भागधारक तोपिनकट्टी
