खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तावरकट्टी दांडोली रस्त्यादरम्यान असलेल्या उब्रापाणी या गावाशी जोडणाऱ्या एका नाल्यावरून रस्ता पार करत असताना गुरे चराव्यास गेलेल्या मायलेकी नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.
या घटनेत सखुबाई विठ्ठल येडगे वय 45 व त्याची मुलगी गंगुताई वय 17 या मृत्यूमुखी पडले आहेत. मंगळवारी दिवसभर दांडेली नागरगाळी भागात जोराचा पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्याल पाणी आले. सदर मायलेकी जनावरे घेऊन नाल्याच्या पलीकडे गेल्या होत्या. पण परत येत असताना नाल्यावर पाणी आल्याने रस्ता ओलांडण्याचे धाडस त्या दोघी मायलेकींनी केले. परंतु त्या जोराच्या पाण्याच्या प्रवाहात त्या दोघी वाहून गेल्याची घटना घडली. जनावरे घरी परतली परंतु रात्री उशिरापर्यंत या दोघी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी शोधाशोध केली. नाल्याजवळ एकीकडे चपला तर दुसरीकडे रेनकोट पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी तिथेच शोधाशोध केली. बुधवारी सकाळी जाऊन पुन्हा शोधाशोध केली असता त्या ठिकाणी त्या दोघी नाल्यातून वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. व शोधाशोध केली असता एक किलोमीटर अंतरावर गंगुताई चा मृत्यू हा दिसून आला. सदर घटनेची नोंद दांडेली पोलीस स्थानकात करण्यात आले असून पोलीस याचा तपास करत आहेत. सखुबाई यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे.