खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या दोन-चार वर्षांपासून नोकरीसाठी प्रयत्न व विविध व्यवसायात काम शोधण्यासाठी प्रयत्न करूनही असफल झाल्याने निराशेतून आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार खानापूर तालुक्यातील तोपीनकट्टी येथे सोमवारी घडला आहे. सदर युवकाचे नाव रामू गंगाराम नावगेकर (वय 23) असे आहे. सदर युवक गेल्या एक-दोन वर्षापासून नोकरीसाठी व व्यवसायासाठी प्रयत्न करत होता. पण त्याला यश येत नसल्याने तो निराश होता. रविवारी सायंकाळी घरच्या समवेत जेवण करून झोपी गेला सकाळी सातच्या सुमारास तो अजून का उठला नाही हे पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता त्याने पत्र्याच्या हूक्काला दोर टाकून गळफास केल्याचे दिसून आले. गावात गेल्या दोन दिवसापासून रंग असलेल्या वातावरणामुळे प्रारंभिक वितर्क निर्माण झाले. पण नंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही घटनास्थळाची चौकशी झालेल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केले. यासंदर्भात खानापूर पोलिसात नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.