खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील तोपीनकट्टी येथे शुक्रवारी झालेल्या किरकोळ वादाचे कारण विकोपाला गेले अन् गावाला वेठीस आणण्याचा प्रकार घडला, ही बाब गावात अशांतता प्रसरण्याचा एक प्रकारच म्हणावा लागेल. दोन गटातील युवकांच्यात मसोटीच्या बांधावर झालेल्या या किरकोळ वादाचे पर्यावरण दगडफेकीत झाले, याला कारणीभूत कोण? या प्रकरणातील खरे दोषी कोण ? चोर सोडून संन्यासानाच फासी मिळणार का? असे अनेक प्रश्न गाव परिसरातून चर्चेत आहेत.
- खरंतर गावातल्या दोन्ही गटातील ते युवक गाव सामंजस्यात कधी सामील नसतात. मात्र उपद्रव्य वाढवून गावाला वेठीस धरण्याचा प्रकार या युवकांनी केला आहे. त्यामुळे अशांना चांगली सबकच मिळाली पाहिजे. यात शंका नाही. मात्र येथील दोन्ही गटातील युवक हे येथील मसोटीच्या बांधावर दोन दिवसापूर्वी नाहक भांडण करतात आणि जाता जाता एकाने दुसऱ्याला दुचाकीवरून हात मारला म्हणून परस्पर जाऊन किरकोळ मारामारी करतात, हे झाले या भांडणाचे मूळ कारण. पण या किरकोळ भांडणा मागचे सूत्रधार कोण, यापूर्वीही गावात दोन गटात किरकोळ वाद झाला होता पण दोन्ही गटातील सुज्ञ नागरिकांनी या प्रकरणावर वेळोवेळी पडदा पडून गावात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण शुक्रवारी तसेच त्या अगोदर दोन दिवस म्हणजे ऋषीपचमी दिवशी झालेला हा किरकोळ वादाचा प्रकार नाहक गावाला वेठीस धरणारा ठरला आहे. अलीकडेच खानापूर तालुक्याने या गावाला प्रथम स्थान दिले आहे. असे असताना गावात अशा पद्धतीची भांडण व कुरापती करून तालुक्यात चर्चेला आणणे हे साप चुकीचे आहे. असो, मुलांच्यात किरकोळ भांडण झाल असेल, तुमच्या तुमच्या समाजातील सुज्ञ नागरिक समजावणारे आहेत, ना? मसोटीच्या बांधावर मुला मुलांच्या झालेला वाद, किरकोळ हाणामारी याचे एवढे मोठे राजकारण एका गटातील त्या मुलांनी करणे योग्य नव्हते. गावातील प्रमुखानी त्याएका गटातील मुलांना विश्वासात घेऊन झाल्याचा प्रकार ऐकला होता. दुसऱ्या गटातील युवकांच्याशी बोलून नेमका काय प्रकार घडला याची माहिती घेण्यापूर्वीच हा वाद चिघळला. गुरुवारी सायंकाळी गावातील प्रमुख पंचांनी बैठक घेऊन यावर पडदा पाडण्याचे ठरवले होते. पण बैठकीपूर्वीच एका गटांनी हलगी मोर्चा करून गावात आंदोलनाचा पवित्र घेतला, याला प्रतिकार म्हणून दुसऱ्या गटांनी घोषणाबाजी करत हम भी किसीसे कम नही! अशा अविर्भावात आमने-सामने आले. अन् याचे परिवर्तन दगडफेकीत झाले. दगडफेकीत पोलिसांच्या जबाबदारीचे भानही त्या युवकांना कळाले नाही का? दरम्यान आमदार विठ्ठल हलगेकर गावात pkps च्या बैठकीला उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर सामूहिक बैठक घेऊन वादावर पडदा पाडण्यासाठी पोलीसही दाखल झाले होते. दोन्ही गट परस्पर आल्यानंतर त्यातीलच काही समाजकंटकानी लपून दगडफेक केली. या प्रकारात पहिले दगड फेकणारे समाजकंटक कोण? याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर पहिली कारवाई करणे गरजेचे आहे. गावात झालेला तणावपूर्ण वातावरण हे गावच्या एकीला खीळ घालणारे आहे. खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा या गावाने चर्चेला उधाण आणले आहे, खरं तर या गावाला लोकप्रतिनिधित्व तालुक्याने दिले आहे अशा पद्धतीत एका गटाने गावच्या सर्वस्वाचा व विकासाचा व एकोप्याचा विचार करता योग्य निर्णय घेणे गरजेचे होते. आमदारा ंच्या गावात हलगी मोर्चा करून आंदोलन करण्याची काय गरज होती. गावातल्या किरकोळ वादात बाहेरच्या लोकांची काय गरज होती?. बाहेरच्या लोकांनी गावात येऊन नको तो उपद्रव करणे हे अत्यंत चुकीचे आहे. असाच उपद्रव्य गावागावात होत गेला, तर एक दिवस हर एक गावातील प्रमुखांनाच तोंड घशी पडण्याची वेळ येईल यात शंका नाही. यासाठी अशा प्रकारावर वेळीच आवर घ**** गरजेचे बनले आहे. तोपिनकट्टीत झालेल्या या दगडफेकीच्या प्रकारानंतर प्रत्यक्ष दर्शनी असलेल्या पोलिसांनी आत्तापर्यंत 8 जनावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्ह्याची नोंद केली आहे. यापैकी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली अन्य सहा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. तर उर्वरित 60 जणांच्या वर गावात शांतताभंग निर्माण करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.