IMG-20251207-WA0035

तिवोली-देसाईवाडा येथे गणेश मंदिराचा वर्धापन दिन : माहेरवाशीनिंचा सत्कार

फोटो : तिवोली-देसाईवाडा : कार्यक्रमात बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील बाजूला गोपाळ देसाई, संजीव पाटील, आबासाहेब दळवी, कृष्णा गुरव व इतर.

खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी

मंदिरांमुळे संस्कृती रक्षणा बरोबरच परोपकार आणि मानवतावादाचा संस्कार होण्यास मदत होते. भावी पिढी तेजस्वी आणि गुणसंपन्न व्हावी यासाठी शिक्षणाबरोबरच संस्कारही महत्वाचे असून मंदिरातून हे कार्य प्रभावीपणे घडू शकते असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
तिवोली-देसाईवाडा (ता. खानापूर) येथील गणेश मंदिराच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित माहेरवासिनींच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, समाजात सलोखा, बंधुभाव आणि ऐक्य टिकवून ठेवण्याचे काम मंदिरांसारखी धार्मिक स्थळे उत्तमपणे करत आहेत. निसर्गरम्य वातावरणातील गणेश मंदिरामुळे हा परिसर चैतन्यदायी आणि पवित्र धाम बनला आहे. याची जाणीव ठेवून गावातील तरुणांनी योग्य मार्गाची कास धरावी असे आवाहन केले.
निवृत्त मुख्याध्यापिका अरुंधती दळवी व शिरोली पीकेपीएस संघाच्या संचालिका प्रभावती देसाई यांच्या हस्ते माहेरवासिनींचा सत्कार करण्यात आला. सैन्य दलातील निवृत्त जवान व नुकताच भरती झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, राजाराम पाटील, उत्तम पाटील, गणेश गावडे, अमृत देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत देसाई, सटवाप्पा देसाई, दीपक देसाई, उत्तम देसाई, शंकर देसाई, मारुती देसाई, गुरुदत्त देसाई, विठ्ठल देसाई, शाहू देसाई, विशाल देसाई, गुरुप्रसाद देसाई, निळकंठ देसाई यांनी परिश्रम घेतले. महादेव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत देसाई यांनी आभार मानले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us