IMG_20231220_170155

खानापूर : ज्या गावात गणपतीचे मंदिर आहे तेथे जरूर वास्तव्य करावे. ज्या गावात गणपतीचे मंदिर नाही अशा ठिकाणी राहण्याचा मानवाला अधिकार नाही कारण गणेश ही देवता आद्य पुजक आहे असे भारतीय संस्कृतीत गणले जाते.या छोट्याशा दहा घराच्या वसाहतीमध्ये असे हे गणेश मंदिर उभारले त्याबद्दल मी या ग्रामस्थांचे कौतुक करतो असे तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी काढले. देसाईवाडा, तिवोली येथील गणेश मंदिराचा १५ वा वर्धापन दिन मंगळवार दि. १९ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी देसाईवाडा आणि तिवोली येथील ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सुभेदार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, गोपाळराव देसाई, देसाईवाडा होते.

याप्रसंगी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस राष्ट्रपती आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य गोपाळराव पाटील व पांडुरंग सावंत, म ए समितीचे ज्येष्ठ सदस्य व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी एम भोसले गुरूजी, सचिव अनंत मष्णू पाटील गुरूजी, इटगी पंचायतीचे चेअरमन तुरमुरी, राजाराम देसाई हलशीवाडी, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ हेब्बाळकर, मारुती नारायणराव दळवी, प्रकाश नारायण पाटील, महादेव अमृत पाटील, विठ्ठल बळवंत देसाई, यशवंत दत्तू देसाई, यशवंत बळवंत देसाई, शाहू यशवंत देसाई, सटवाप्पा तुकाराम देसाई, निळकंठ पावणाप्पा देसाई, शंकर कृष्णा देसाई, दिपक मारुती देसाई, उत्तम मारुती देसाई, मारुती अनंत देसाई, महादेव बापू देसाई, मनोहर बापू देसाई, नंदकुमार गोविंद देसाई, सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य, महादेव नारायण पाटील, पुंडलिक बाबूराव लाटगावकर, सहदेव शांताराम हेब्बाळकर, विठ्ठल गंगाराम पाटील गुरूजी, कृष्णा गुरव शिरोली, यल्लाप्पा पाटील तिवोली, उत्तम राजाराम देसाई अभियंता गर्लगुंजी, विनायक मल्लू मुतगेकर अध्यक्ष ग्रामपंचायत असोशिएशन खानापूर तालुका यांसह शिरोली, नेरसा, मणतुर्गे, आणि गर्लगुंजी यांसह अनेक गावांतील गणेश भक्त या वर्धापन दिनाला हजर होते. ‌ या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ लक्ष्मण हेब्बाळकर गुरूजी यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पीकेपीएस शिरोली येथील सोसायटीच्या संचालकांचा बिनविरोध निवड झाल्याबद्दल कृष्णा कल्लाप्पा गुरव, यल्लाप्पा निंगोजी पाटील, मार्शल गुस्ताव सोज, नागाप्पा इंद्राप्पा देसाई, सौ. प्रभावती गोपाळ देसाई, सौ. लक्ष्मी मारुती तिणेकर, गणपती रामा हणबर, विजय कृष्णा मादार, नारायण ईराप्पा पाटील, राजाराम सुर्योबा गावडा, मारूती केळू गांवकर, विलास अशोक अय्यर (सचिव) यांचा शाल, श्रीफळ, फेटा अर्पण करून सत्कार करण्यात आला. तसेच देसाईवाडा येथील नव्याने घरे बांधली जावीत यासाठी प्रोत्साहनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपयांची बहुमोल देणगी निवृत्त सुभेदार श्री गोपाळराव देसाई यांनी देऊ केले. आतापर्यंत सात नवीन घरे बांधणार्‍यांना देणगी देण्यात आली. आज या कार्यक्रम प्रसंगी विद्यमान आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील यांच्या हस्ते श्री नंदकुमार गोविंद देसाई व यशवंत बळवंत देसाई या दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले. या कार्यक्रमावेळी म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी आमदार दिगंबरराव पाटील, माजी आमदार श्री अरविंद पाटील, विद्यमान आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि सभेचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी कार्यक्रमाला अनुसरून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बळवंत देसाई यांनी केले. या कार्यक्रमाला देसाईवाड्याच्या सर्व माहेरवाशिणी उपस्थित होत्या.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us