खानापूर:
कर्नाटक राज्य पातळीवरील महिला खो-खो चॅम्पियनशीप क्रीडा स्पर्धा रविवारी तुमकुर येथे पार पडल्या. कर्नाटक राज्य योजना सेवा तसेच तुमकुर जिल्हा आमटूर असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्य पातळीवरील महिला खो-खो क्रीडा स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याच्या महिला खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावून चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे. बेळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या या महिला खो-खो संघात खानापूर तालुक्यातील चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींची निवड झाली असून या तीन विद्यार्थीनीची कर्नाटकातून राष्ट्र पातळीवरील महिला खो-खो संघात ऑलिंपिक साठी त्यांची आता निवड झाली आहे.
तुमकुर : चॅम्पियन शिप समवेत कर्नाटक राज्य खो खो महिला संघ…
यामध्ये चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी अपेक्षा महेश निलजकर, कुमारी साक्षी विष्णू देवलकर, कुमारी लक्ष्मी मोहन हंगिरकर या तीन विद्यार्थी ऑलम्पिक साठी निवड झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूलच्या या तीन विद्यार्थ्यांची ऑलम्पिक साठी निवड झाल्या बद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन होत आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक पी बी पाटील, सहशिक्षक तुकाराम सनदी शारीरिक शिक्षक व पालक वर्गाने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचेही शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.