बेळगाव / प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात लष्करी वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील तीन जवानांसह एकूण पाच जवानांचा मृत्यू झाला.
मंगळवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या लष्करा च्या वाहनात ८ – ९ जवान होते. अपघातानंतर एकूण पाच जवान शहीद झाले. यातील तीन जवान कर्नाटकातील आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव पंत बाळेकुंद्री येथील सुभेदार दयानंद तिरकणवर (वय ४५), उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरजवळील कोटेश्वरच्या बिजाडी येथील अनूप (वय ३३) आणि बागलकोट जिल्ह्यार्तील महालिंगपुर येथील महेश मेरीगोंडा (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य जवानांवर उपचार सुरु आहेत.
दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत. सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि सांबरा गावावर शोककळा पसरली आहे. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.