खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापुरातील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर कालच लोकायुक्तांची धाड पडल्याने चर्चेचा विषय असताना खानापुरात भू- मापन कार्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खानापूर भूमापन कार्यालयातील प्रभारी एडी एल आर सह दोन सर्वेअर असे एकूण तीन अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची वेळ आली आहे.
याबाबत माहिती की, खानापूर तालुक्यातील हुळंद येथील 500एकर जमीन प्रकरणात खानापूर भूमापन केंद्रातील प्रभारी ए डी एल आर सह आणखी दोन सर्वेअरनी कागदोपत्री गोलमाल केल्याने येथील लोकांच्यावर जमीन हुसकावण्याची पाळी आली होती. या संदर्भात राज्य काँग्रेस सरकारकडे अनेक वेळा तक्रार झाली होती. येथील अनेक नागरिकांनी माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली ते निंबाळकर यांच्याकडे या भू- मापन खात्यातील तक्रार नोंदवली होती. हुळंद येथील जवळपास 500 एकर जमिनीचा कागदोपत्री व्यवहार गोलमाल करत येथील जनतेला वेटीस आणण्याचा प्रकार तहसीलदार कार्यालयातील भू- मापन कार्यालयातून करण्यात आला होता. या सखोल प्रकरणासंदर्भात डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी कर्नाटक राज्य सरकार महसूल विभागाकडे तक्रार नोंदवून यातील त्रुटी निदर्शनाला आणून दिल्या होत्या, याची दखल घेऊन खानापुरातील इंचार्ज एडीएलआर किरण कुमार, सुपरवायझर सर्वेअर पत्तार तसेच सर्वेअर मुतगी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या राज्यात कॉंग्रेस सरकार आहे ,जनतेसाठी राबणारे सरकार आहे
गोर गरीब जनतेसाठी गॅरंटी योजना राबविणारे सरकार आहे. जनतेच्या कल्याणासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे जो अधिकारी चूक करेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसने शस्त्र उभारले आहे त्यामुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांचे धबे दणाणले आहेत.खानापूर तालुक्यातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी जनतेला नाहक त्रास देत असून भ्रष्टाचार बोकाळला असून यासंदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा काहीच करत नाहीत. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या निदर्शनाला ज्या गैर व्यवहाराच्या गोष्टी व जनतेला जिथे नाहक त्रास होईल त्या ठिकाणी कटाक्षाने लक्ष देऊन जशास तसे उत्तर देण्यासाठी त्यांनी आपला क्रम हाती घेतला आहे.
मध्यंतरी हुळंद च्या ५०० एकर जमिनी संदर्भात खानापूर तहसिलदार म्हणा किंवा सर्वे ऑफीस च्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केली … हु़ळंद चे ग्रामस्थ सतत ताईंना यासंदर्भात मदत करण्यास सांगत होते.
हुळंद जे नागरिक या अन्यायासंदर्भात नेहमी माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्याकडे आपली कैफियत मांडत आले होते. त्यामुळे डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी सरकार दरबारी आवाज उठविला, आणि सरकारने शेवटी आज कारवाई केली ? बऱ्याच जणांनी या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी हुळंद जमीन प्रकरण या अधिकाऱ्यांच्या अंगलट आले … आणि कारवाई झाली.सर्वे ऑफीस मधे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतं होता.सतत हेसपाटे मारावे लागतं होते…
जनता कंटाळली होती.