Screenshot_20240822_203108

खानापूर: मुलीच्या लग्नाची ताटातून झाली. बापाने घर सोडले. उपवर झालेल्या मुलीला योग्य ठिकाणी लग्न लावून देण्यासाठी प्रत्येक बाबाची इच्छाशक्ती असते. पण मुलगीच बापापासून दूर गेली तर बापाने काय करावे असा प्रश्न नेहमी उपस्थित राहतो. अशाच प्रकारे बेंगलोर येथील आर टी नगर मधील एका व्यक्तीला आपल्या मुलीचा विरह सहन न झाल्याने बाप सैरावैरा झाला आणि त्याने घर सोडले. रेल्वेने तो लोंढ्याला आला असावा आणि तिथून चालत त्याने खानापूरच्या दिशेने येताना माणिकवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या नजरेत दिसून आला . भरकटलेल्या त्या व्यक्तीला माणुसकीचा आधार देत मायेचा उद्धार ही देऊन त्याची खानापूर पोलिसांच्या स्वाधीन करत माणुसकी दाखवण्याचा प्रकार माणिकवाडीतील ‘ या’ सामाजिक कार्यकर्त्याकडून घडला याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसते

याबाबत मिळालेली माहिती की , गुरुवारी खानापूर तालुक्यातील माणिकवाडी जवळ भरकटत नग्न पावसात भिजून ओले चिंब झालेल्या एका अनोळखी इसमाकडे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य , प्राध्यापक शंकर गावडा यांचे लक्ष गेले. व त्याची विचारपूस केली. गहिवरलेल्या त्या व्यक्तीने प्रारंभी काहीही सांगण्यास नकार दर्शविला. त्याची परिस्थिती पाहता त्या इसमाला माणिकवाडी येथील तरुणांनी मायेची उब दिली. या घटनेने अक्षरशः पोलीस देखील गहिवरले. मनोरुग्ण असलेला एक इसम खानापूर लोंढा मार्गावर फिरत असताना अनेकांनी पाहिला होता. पण त्याची विचारपूस करण्याची तसदी मात्र कोणीच घेतली नव्हती. मात्र आज सकाळी माणिकवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा हे आपल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात जात असताना सदर इसम दिसला. तो रात्रभर पावसात भिजल्याने थंडीने कुडकुडत होता. शंकर गावडा यांनी त्या इसमाची अवस्था पाहून तात्काळ त्याचे सहकारी ज्ञानेश्वर गावडा, पांडुरंग पाटील, शंकर पाटील यांच्या मदतीने त्या इसमाला उपदार कपडे दिले. व खानापूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस जयराम यांनी देखील घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला रुग्णवाहिका बोलावून खानापूर शासकीय इस्पितळात दाखल केले. सदर इसम पावसामध्ये ओलाचिंब होऊन फिरताना त्याला मदतीचा हात देत प्राध्यापक शंकर गावडा त्यांचे सहकारी आणि पोलीस जयराम यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी बद्दल त्यांचे कौतुक होत आहे . सदर व्यक्तीने आपण बेंगलोरचा असल्याचे सांगितले असले तरी त्याचे नाव व पत्ता अद्याप मिळाला नाही त्यामुळे पोलीसही याचा तपास करत आहेत. सदर इसमाची कोणाला ओळख असल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us