नागपूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: येथील खानापूर रेल्वे स्टेशनजवळील जुना मंचापूर रोड येथील याबाबतची वसाहतीतील युवकाचा हालात्री नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास घडली आहे. बुडाल्याची माहिती कळताच शोधाशोध केली पण मृतदेह हाती आला नसल्याने सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य हाती घेण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खानापूर रेल्वे स्टेशनजवळील जुना मंन्सापूर रोड येथील वसाहतीतील रहिवासी असलेला रवीकृष्णा बडलमगोळ (वय २४) हा. आपल्या मित्रांसमवेत हालात्री नदीच्या किनाऱ्यावर पार्टीला गेला होता. पार्टी करून जेवण केल्यानंतर नदीत गेला असता नदीपात्रातील डोहात बुडाल्याचे कळते . याबाबत ची माहिती त्याच्या घरच्यांना मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू अंधार पडल्याने मृतदेह शोधकार्य थांबविण्यात आले.
सोमवारी पहाटे 6 वाजता पासून शोध कार्य हाती घेण्यात आले आहे. रवी बडलमगोळ हा आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याचे वडील येथील एका टाईल्स काम करत होता.