Screenshot_20240719_230647

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

गेल्या आठ दिवसापासून मृत्यूचा सामना करत उपचार घेणाऱ्या त्या रुग्ण महिलेने अखेर आपला अखेरचा श्वास घेतला आहे गुरुवारी सकाळी सदर महिलेचा रुग्णालयात उपचारा अभावी मृत्यू झाला. त्यामुळे आमगाव वाशीयांच्या त्या प्रयत्नांना अखेर यश आले नाही. सदर महिलेला उपचारासाठी जिवंतपणीच तिरडीचा आधार घ्यावा लागला होता. आता पुन्हा त्याच महिलेला मरणानंतरही तिरडीचा आधार घेऊन गावापर्यंत पोहोचवण्याची वेळ ग्रामस्थांच्यावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत व तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

खानापूर तालुक्यातील आमगाव येथील सौ हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 31) या महिलेला छातीत दुखत असल्याने तिला उपचारासाठी तब्बल पाच किलोमीटर जिवंतपणे तिरडीचा आधार घेऊन दवाखान्याला पोहोचवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला. घडलेल्या या प्रकाराबद्दल संपूर्ण जिल्ह्यात एक चर्चेचा विषय बनला स्वातंत्र्यानंतरच्या 75 येते. ही येथील नागरिकांना नागरिकत्वाचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे पावसाळ्यात जगणारे जीवन हे त्या कुटुंबीयांना किती त्रासदायक अवयत्नादायक आहे. याचे ज्वलंत उदाहरण अलीकडेच दिसून आले. पाच किलोमीटर तिरडी वरून हाणून तिच्यावर उपचारासाठी बेळगाव येथे दाखल करण्यात आले. खासदार विश्वेश्वर हेगडे यांनीही याबाबत तिच्या उपचारासाठी दखल घेण्याची काळजी घेतली. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस तथा अंजलीताई फाऊंडेशनच्या वतीने प्रत्यक्ष आमगाव गावापर्यंत पायी चालत जाऊन त्यांच्या व्यथा व कथा जाणून घेतल्या व थोडीफार आर्थिक मदतीची माणुसकी दाखवली. पण हे सगळे प्रयत्न असफल ठरलेच. पुरेपूर उपचाराचे प्रयत्न करूनही अखेर त्या महिलेच्या आरोग्यात सुधारणा झाली नसल्याने तिने आज सकाळी अखेरचा सोडला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us