Oplus_16777216
चापगांव ता. खानापूर तालुक्यातील सकल मराठा आरक्षणा साठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिबा जाहीर करण्यात आला. सोमवारी गावातील व परिसरातील अनेक सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
सिमा भागातील खानापूर तालुक्यातील चापगांव समस्त मराठा बांधव एकत्रित येवून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही , मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुमारे साथ है अशा घोषणा करत परिसर दणाणून सोडला
या अंदोलनावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमेश धबाले . पिराजी कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले
येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी चापगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, माजी सभापती मल्लाप्पा मारिहाळ,नागराज धबाले, अभिजीत पाटील,नारायण गोदी .विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी .विलास धबाले .हनुमंत पाटील .मुकुंद पाटील .मष्णू चोपडे .शिवाजी मादार सहसमस्त ग्रामस्थ उपस्थित होते