खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
गेल्या दोन दिवसापासून चापगाव भागात स्थिरावलेल्या त्या हत्तीने आपला मुक्काम आता कार्यकाळ दिवसापासून चापगाव भागात स्थिरावलेल्या त्या हत्तीने आपला मुक्काम आता कार लगा डोंगरी माळ असलेल्या शिवारात केला आहे. मंगळवारी दिवसभर सदर हत्ती मलप्रभा नदीच्या काठाकडे स्थिरावला होता. रात्री रातभर त्या हत्तीने आपला प्रवास चापगाव व कारलगा सर हद्दीवरील जळगा रस्त्यावर असलेल्या डोंगरी माळ या ठिकाणी केला आहे शिवोली येथील सयाजी पाटील यांच्या ऊस पिकात रात्रभर त्याने ठाण मांडले होते बुधवारी सकाळी 10 नंतर सदर हत्ती डोंगरी माळ येथील जळगे येथील विठ्ठल ठाकूर यांच्या ऊस फडात होता. त्या ठिकाणी बघा यांची एकच गर्दी झाली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत सदर हत्ती त्याच ठिकाणी घुमटलत होता. सदर हत्तीकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसले तरी अनेक युवा वर्ग त्याला हुसकावत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याने तो भितरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.