खानापूर लाईव्ह new/ प्रतिनिधी:
खानापूर जवळील बेळगाव – पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल टोल प्लाझा नाक्यावर मासिक पास असूनही वाहनधारकांना तांत्रिक अडचणीचे कारण तथा मासिक पासच्या खात्यावर निर्धारित रक्कम हवीच असे कारण पुढे करून वाहनाना अडवण्याचे प्रकार अनेक वेळा घडत आले आहेत. अशाच प्रकार आज शनिवारी खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के.पी. पाटील यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे श्रीमान के.पी. पाटील यांनी टोलनाका व्यवस्थापनाच्या विरोधात खानापूर पोलीस स्थानकात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गणेबैल टोलनाका पुन्हा एकदा चर्चेच्या विळख्यात सापडला आहे.
याबाबत के.पी. पाटील यांनी दिलेली माहिती की , नेहमीप्रमाणे बेळगावहून खानापूरला आज शनिवारी येत असताना टोल नाक्यावर गाडी अडवण्यात आली. तुमचा मासिक पास असला तरी काय झाले, तुमच्या खात्यावर निर्धारित रक्कम आवश्यक असल्याचे टोल नाक्यावरील कामगारांनी सांगितले. आपल्या खात्यावर निर्धारित रक्कम जमा करण्यासाठी संबंधित फास्टट्रॅक च्या खात्यावर रिचार्ज करण्यासाठी प्रयत्न केला पण तो झाला नाही. ही तांत्रिक अडचण त्या फास्टट्रॅगची होती. विनवणी करूनही वाहन सोडण्यात आले नसल्याने आपण खानापूर पोलीस स्थानकात नाक्या च्या या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. असे त्यांनी सांगितले.
वास्तविक मासिक पास असून सुद्धा गणेबैल टोलनाक्यावर लोकांची अडवणूक करण्याचा हा प्रकार म्हणजे मनमानी कारभार आहे .एकीकडे खानापूर तालुक्यातील काही बड्या नेत्यांची वाहने विनापास चालू आहेत, अशी यापूर्वी तक्रार झाली होती. या विरोधात खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने खानापूर पोलीसात एफ आय आर देखील दाखल केली आहे . काही बड्या नेत्यांच्या वाहनांना आजही मोफत सोडले जाते. यासाठी येथील कर्मचाऱ्यांना ठराविक बड्या नेत्यांच्या वाहनांचे नंबर देण्यात आले आहेत ते वाहन आले की त्यांना कोणत्याही प्रकारचा फास्टट्याग किंवा संबंधित खात्यावर पैसे पाहिजे असेच नाही. तर मग आपण मासिक पास काढूनही जर एखाद्या वेळी खात्यावर रक्कम कमी जास्त झाली म्हणून ते वाहन अडवणे हे साफ चुकीचे असून या टोलनाक्यातील गैरकारभाराची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.