
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते, याचेच एक ज्वलंत उदाहरण खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी अर्थात फुलेवाडीच्या गवंडी काम करणाऱ्या युवकाच्या बाबतीत घडले. दोन मजली इमारतीवर काम करत असताना अचानक पायाटाची पाया खालची फळी तुटली. आणि सदर गवंडी काम करणारा युवक जमिनीवर कोसळला. जमिनीच्या खाली एका कॉलम मध्ये उभा असलेला तीन फुटी 12 एमएम चा रॉड त्याच्या मूत्राशयाजवळून हृदयापर्यंत शरीरात घुसला. अन तो युवक तेथेच अडकून बसला. मृत्यूच्या दाढेत विवळत असताना सदर युवकाला रॉड तोडून कसेबसे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील सदन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. आणि आणि तेथील डॉक्टर पट्टणशेट्टी यांनी यशस्वीरित्या त्या गवंडी युवकाला अधिक प्रकारची इजा न होता सुखरूपपणे त्याला जीवदान दिले. ही घटना पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि ऐकणाऱ्यांच्या हृदयात ठोके देणारी ठरली.
याबाबत अधिक माहिती की, खानापूर तालुक्यातील फुलेवाडी येथील युवक हा गडहिंग्लज येथे गवंडी कामासाठी राहतो. रविवारी दुपारी तो गवंडी काम करत असताना पायावरील फळी तुटली आणि तिथून सलग दोघेजण खाली कोसळले. त्यापैकी एकजण किरकोळ दुखापत होऊन बचावला. मात्र महादेव कुंभार थेट वरून खाली कोसळला तो पायाखाली असलेल्या 12 एमएम च्या 3 फूट लांबीच्या रॉड मध्ये तो उभाच कोसळला. दुर्दैवाने त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी रॉड त्याच्या मूत्राशयाजवळून पोटातून छातीपर्यंत घुसला आणि तो बालाबाल बचावला. रॉड मध्ये अडकलेल्या युवकाला जवळच्या लोकांनी आरडाओरडा करून रॉड तोडून दवाखान्यात आणले. तातडीने डॉक्टर नागेशपट्टणशेट्टी, डॉ. डांग, डॉ. बी आर पाटील त्यांच्या पत्नी बालरोगतज्ञ डॉक्टर राजश्री पट्टणशेट्टी व डॉक्टर अथक परिश्रमाने त्या युवकाला जीवदान मिळाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे मनापासून आभार मानले.
भैरू कुंभार..
दरम्यान अपघाताची बातमी करतात ग्रामपंचायतचे सदस्य भैरू पुंडलिक कुंभार यांनी आपल्या मित्रासमवेत व कुटुंबासमवेत गडहिंग्लज गाठले व येथील सदन हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाणी केली डॉक्टर पट्टणशेट्टी यांनी महादेव कुंभार पुनर्जन्म दिल्याबद्दल त्यांनी सेवासदन हॉस्पिटल, डॉक्टर पट्टणशेट्टी हॉस्पिटल डॉक्टरांचे मनापासून आभार मानले आहेत.