
खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी : खानापूर हायटेक बस स्थानक हे खानापूरची शान बनली आहे. पण याच बस स्थानकात काम करणाऱ्या कंट्रोलर वर जर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कंट्रोलच नसेल तर… अशा या हायटेक बस स्थानकाची वेगळीच ओळख निर्माण होईल यात शंका नाही अशाच प्रकारे येथील बस स्थानकातील आवक- जावक करणाऱ्या बस कंट्रोलर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताच कंट्रोल नसल्याने चक मध्ये धुंद अवस्थेत एक कंट्रोलर त्या ठिकाणी बिनधास्त निद्रा घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या बस स्थानकातील कंट्रोलरवर नेमका कंट्रोल कोणाचा? असा प्रश्न येथील ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
येथील नवीन हायटेक बस स्थानकात अलीकडे सुविधा मिळत आहेत. मात्र या ठिकाणी कामचुकार करणारे अनेक कर्मचारी ही काही कमी नाहीत. अशाच प्रकारे रविवारी दुपारी बस स्थानकात येणाऱ्या बसेसची आवक – जावक नोंद करणाऱ्या कंट्रोलर चा चांगलाच प्रताप काही प्रवाशांच्या निदर्शनाला आला. दुपारनंतर एक कंट्रोलर त्या ठिकाणी नोंद करण्याऐवजी टेबलवर नोंदणी पुस्तक तेथेच टाकून बाजूच्या खोलीत मद्यधुंद अवस्थेत गडद झोपेत घुरत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना बसची चौकशी करण्यासाठी तेथे कोणीच नसल्याने बाजूच्या कंट्रोलर रूममध्ये पाहिले असता त्या ठिकाणी सदर कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत झोपून हराम घेत असल्याचे दिसून आले, मात्र इकडे कंट्रोलरच्या काउंटरवर असलेल्या पुस्तकात येणाऱ्या कंडक्टरनी स्वतःच आवक-जावक ची नोंदणी करून जात असल्याचे दिसले. गोधोळी, रामनगर भागात जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी त्या ठिकाणी बसेसची वेळापत्रक चौकशीसाठी त्या ठिकाणी विचारले असता कोणीही दाताच नसल्याचे त्या ठिकाणी निदर्शनाला आले. त्यांनी तातडीने भागाकार प्रमुखांना भेटून सदर निष्काळजीपणाबद्दल खेद व्यक्त करून तक्रारही नोंदवली. खानापूर बस आगार म्हणजे काहींचा अड्डाच बनला आहे, अशा वाढत्या तक्रारी आहेत यावर बस आकाराचे वरिष्ठ अधिकारी निर्बंध घालून या हायटेक बस स्थानकाला हायटेक दर्जा देतील का?असा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे.