खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यात रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसते आहे अशाच प्रकारे नागरगाळी -कटकोळ या राज्यमार्गा पैकी नंदगड पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कीरहलसी ते हलगा दरम्यान रस्त्या बाजूने देगाव पाणी योजनेअंतर्गत मारण्यात आलेल्या एका चरित बस अडकल्याने वाहन हलगा दरम्यान रस्त्या बाजूने देगाव पाणी योजनेअंतर्गत मारण्यात आलेल्या एकाचरित बस अडकल्याने बस चालकाची कसरत झाली. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दांडेलिहून नागरगाळी मार्गे खानापूर ला येणाऱ्या दांडेली बस चालकाने दुसऱ्या एका ट्रकला वाट देताना बस बाजूला घेतली. त्या बाजूने पाणी योजनेची पाईपलाईन घालण्यात आली होती . सदर बाब चालकाच्या लक्षात आले नसल्याने बस त्या चरित अडकली. त्यामुळे दांडेली ला जाणाऱ्या बस मधील प्रवाशांची चांगलीच गोची झाली. आता परिश्रमातून बस बस काढण्यात आली. एकंदरीत या रस्त्यावरील परिस्थिती अडचणीची बनली आहे. हलगा ते हत्तरवाड दरम्यान रस्त्याचे काम अर्धवट करून सिंगल रस्ता ठेवण्यात आला आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने एखादे वाहन उतरल्यास मोठी अडचण होत आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग म्हणजे अडचणीचा अडथळा झाला आहे.