खानापूर:
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जांबोटी भागात गेल्या 32 वर्षांपूर्वी दिन दलित 12 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून स्थापन केलेल्या पतसंस्थेला आज 33 वर्षे पूर्ण होत आहेत. जांबोटी को ऑफ सोसायटीच्या नावे सुरू करण्यात आलेल्या या इवल्याच्या रोपट्याचे आज 33 वर्षात पदार्पण होत आहे. या पतसंस्थेचा महामेरू श्री विलास बेळगावकर यांच्या दूरदृष्टीकोनतून साकारलेली ही पतसंस्था आज यशाची घोडदौड राखत यशस्वी वाटचाल करत आहे. या पतसंस्थेच्या खानापूर येथील शाखेच्या आज 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज दि. 1 जानेवारी 2025 रोजी खानापुरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सहकार तत्त्वावर चालणारी पहिली सोसायटी म्हणून ओळखली जाणारी दिं जांबोटी मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी म्हणून ओळख असलेल्या या पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन विलासराव बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली – महाराष्ट्रातील सहकार चळवळीची न प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या सोसायटीची नऊ वेळा बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. जांबोटी, कणकुंबी, बैलूर, खानापूर, बिडी, बेळगाव तसेच तालुक्याच्या विविध भागातील जनतेच्या आर्थिक गरजा या सोसायटीने भागवल्या आहेत. विविध कामासाठी कर्ज देऊन सामाजिक बांधिलकी राखण्याचं काम या सोसायटीच्या संचालक मंडळाने केले
दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा.. सत्कार केला जातो. दिनदर्शिका मोफत दिल्या जातात. समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे सर्वांनाच जांबोटी मल्टिपर्पज सोसायटी आपलीशी वाटते.खानापूर व बेळगाव तालुक्यातील खानापूर, बिडी, बैलूर, कणकुंबी, पिरनवाडी, गणेशपूर व टिळकवाडी येथे शाखा आहेत. सोसायटी स्थापन होऊन 32 वर्षे झाली. तर खानापूर शाखेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोसायटीकडे आजपर्यंत भाग भांडवल 1 कोटी 25 लाखाचे आहे. खेळते भांडवल 45 कोटीचे आहे. सोसायटीकडे 40 कोटीच्या ठेवी आहेत. गुंतवणूककोटीची आहे. तर तीन शाखांच्या स्वतःच्या इमारती आहेत. संस्था स्थापनेपासून सोसायटी नेहमी नफ्यात आहे. दरवर्षी वितरण संस्थेच्या लाभांशाचे करतात. रौप्य वर्षानिमित्त सर्व 25 ग्राम सोन्याचे नाणे तसेच संस्थेच्या नावाची बॅग दिली आहे. खानापूर शाखेचा रौप्यमहोत्सव दि. 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. खानापूर शाखेच्या सभागृहात आयोजिला आहे. अध्यक्षस्थानी संस्थापक, चेअरमन विलासराव बेळगावकर राहणार आहेत.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील; तहसीलदारप्रकाश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील, जिल्हा को-ऑप सोसायटी युनियनचे अध्यक्ष आर. बी. बांडग्री, खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, सीडीओ नवीन हुलकुंद, खानापूर को. ऑप. बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर आर. पी. जोशी, खानापूर येथील भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अॅड: व्ही. एन. पाटील, कसंबा नंदगड येथील श्री व्हन्नव्बादेवी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोसायटीच्या सर्व भागधारक, सल्लागार, सभासद हितचिंतक व समस्त जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मंडळातर्फे सोसायटीचे सेक्रेटरी दिलीप हन्नूरकर यांनी केले आहे.