- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- गोमंतकीय भक्तांनी किरावळा गुंजी, ता. खानापूर येथे श्री नवदुर्गा देवीच्या मूळ स्थानी उभारलेल्या पवित्र वास्तू आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास यंदा ११ वर्षे पूर्ण होत असून यंदा १२ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
- श्री नवदुर्गा, श्री नारायण देव, श्री गणपती व श्री ब्रह्मणदेव मूर्ती प्रतिष्ठापनेचा ११वा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि १ मे रोजी थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.
- या निमित्ताने १ मे रोजी सकाळी मंदिरात भुपाळी, काकड आरती, श्रींस मंगलस्नान व पंचामृत महाअभिषेक तद्नंतर यजमान शरिर शुध्दी, प्रायश्चित्त, गणपती पूजन, मातृका पूजन, नंदी श्राद्ध, आचार्य वरण, प्रकार शुध्दी, देवता स्थापना व हवन द्वारा संग्रह नवचंडी विधान व पुर्णाहूती ई.
- दुपारी १२.३० वा. देणगी कुपनाचा निकाल तद्नंतर श्रींची महा मंगलाआरती, मंत्रपुष्पांजली,सामूहिक सांगणे व १.०० वा. महाप्रसाद. तर सांय. श्री नवदुर्गा भजनी मंडळा तर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७.०० वा. महाआरती व तद्नंतर जय श्री हनुमान भारूड भजनी मंडळ, वड्डेबैल, खानापूर यांचा भारूड कार्यक्रम.
- वर्धापन दिन सोहळ्याचे यजमान म्हणून सौ. व श्री पराग नाईक (बाणस्तारी) आणि सौ. व श्री विष्णू बोरकर (बोरी) यांची निवड झाली आहे. याशिवाय इतर यजमान म्हणून अनुक्रमे सौ. व श्री संदिप बोरकर (कुडचडे), सौ. व श्री दामोदर बोरकर (बोरी) व सौ. व श्री सुरेंद्र बोरकर (बोरी) हे सांभाळणार आहेत.
- गुरूवार दि. २ मे रोजी नवमी उत्सवा निमित्त मंदिरात सकाळी सौ. व श्री सचिन कामत (नंदगड खानापूर ) यांच्या यजमानपदाखाली धार्मिक विधी व षोडशोपचार महापूजा. दुपारी श्रींची पालखितून मिरवणूक व महाआरती. दुपारी १.०० वा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
- तरी या कार्यक्रमास भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद घ्यावेत असे आवाहन श्री नवदुर्गा देवस्थान समिती, किरावळा गुंजी. संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.