खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथे प्रति वर्षाप्रमाणे होणारी श्री कलमेश्वर देवस्थान तसेच श्री काळम्मा देवी देवस्थानची यात्रा येत्या 13 व 14 मे रोजी भरवण्याचा निर्णय येथील पंच कमिटीने घेतला आहे. यासंदर्भात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटीची बुधवारी बैठक पार पडली.
- श्री काळम्मा देवी तसेच श्री कलमेश्वर देवस्थान हे या गावचे आराध्य व जागृत देवस्थान मानले जाते. दरवर्षी या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील 13 मे रोजी कलमेश्वर देवाची यात्रा होणार आहे. या निमित्ताने सकाळी दहा वाजता अभिषेक कार्यक्रम व दुपारी महाप्रसाद होणार आहे. सदर महाप्रसाद यावर्षी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे. दि. 14 मे रोजी श्री काळमादेवी ची यात्रा होणार आहे. या देवस्थानला नवस फेड आधी कार्यक्रम व सायंकाळी प्रत्येक घरोघरी पै पाहुण्यांचा प्रीती भोजनाचा कार्यक्रम केला जातोय. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे करण्याचा निर्णय ही पंच कमिटीने घेतला आहे. या बैठकीला आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नारायण गुरव, पंच कमिटीचे सदस्य मारुती गुरव, चन्नाप्पा गुरव, शिवाजी करंबळकर, भरमानी तीरवीर, आप्पा हलगेकर , विनायक सुतार , परसराम गुरव, चांगाप्पा निलजकर, मारुती हालगेकर, विलास तळवार, शिवपुत्र कोलकार, सोमाना मादार, सिद्धू कोलकार यासह पंच कमिटी उपस्थित होते.