- फोटो: प्रमुख पाहुणे पुणेस्थित श्री मोहन पाटील यांचा सत्कार करताना कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग व इतर
- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- विद्यार्थी हा शिक्षणातील केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांचं योगदान महत्त्वाचं आहे. आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच योग्य संस्कार व योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी केले शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार पालकांनी केला व त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन दिल्यास ध्येय गाठण्यास मौलाची मदत मिळते. विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेताना मनपूर्वक अभ्यास हाताला पाहिजेत विद्यार्थी गैरहजर राहू नये नेट का अभ्यास व कामाचे नियोजन पुस्तक नोट्स वाचण्याबरोबर परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधता येतील यासंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्याने वेळापत्रकानुसार अभ्यासात सरस दाखवला तर जीवनात यश हे नक्कीच असे विचार मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात आयोजित पालक जागर सभेत पुणे स्थित उद्योजक व अभियंते मोहन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील होते.
- कॉलेजचे ज्येष्ठ एन ए पाटील , पालक प्रतिनिधी मल्लाप्पा मारिहाळ, मल्लाप्पा अंधारे, श्रीमती अंजुम सडेकर, कॉलेजची जी एस कुमारी सृष्टी पाटील उपस्थित पालक वर्ग प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
- कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या सुमधुर इशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठा मंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष कै. नाथाजीराव हलगेकर व अद्य स्त्री शिक्षण पुरस्कर्त्यां सावित्रीबाई फुले या फोटोंचे पूजन व कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापिका सौ. जे एफ शिवठणकर यांनी केले. व प्रा.श्री एन एम सनदी , प्रा.सौ. एम एम यलजी यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले
- कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणेस्थित आय टी इंजिनिअर मोहन पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी जवळ जवळ 60 हजाराची कॅनाॅन कंपणीची झेरॉक्स मशीन देणगी स्वरूपात दिली म्हणून या ऋणाची परत फेड म्हणून त्यांचा कॉलेजच्या वतीने शाल श्रीफळ व हार घालून कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
- पालक सभेचे औचित्य साधून 2022-23 या वर्षाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुणे मोहन पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. व काॅलेजची जलद धावपटू तसेच खानापूर तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवलेली व जिल्हा पातळीवरील धावणे स्पर्धेत नंबर मिळवून राज्यपातळीवर निवड झालेली कुमारी सानिका फकीरा हंगिरकर हिचा कॉलेजच्यावतीने सत्कार करण्यात आला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
- कॉलेजचे प्राध्यापक टी आर जाधव यांनी या 2023- 24 या वर्षाचा वार्षिक परीक्षेचा 80-20 पॅटर्न व अभ्यासा संदर्भात विद्यार्थिनींची भूमिका काय असली पाहिजे व त्याचबरोबर पालकांची काय भूमिका असली पाहिजे या संदर्भात आपला अभ्यासपूर्ण आढावा मांडला .
- यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले मल्लाप्पा अंधारे, श्रीमती अंजूम सडेकर, मल्लाप्पा मारिहाळ यांनीही आपले विचार मांडले. अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण करण्यास पालक म्हणून आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. पाहुणे म्हणून प्रमुख लाभलेले मोहन पाटील यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थिनींना स्मार्ट स्टडी कशी केली पाहिजे या संदर्भात सह उदाहरण मार्गदर्शन केले तसेच पालकांना पालक म्हणून आपले कर्तव्य कसे निभावले पाहिजे याची जाणीव करून दिली.
- शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अरविंद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात समस्त पालक विद्यार्थिनींना अथक कष्ट घेण्यास सज्ज राहण्याचा सल्ला मार्मिक उदाहरण देऊन पटवून दिले. ते पुढे म्हणाले की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपणा जसा प्राप्त होत नाही. तसे प्रयत्न अभ्यास व त्रास खाल्ल्याशिवाय आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी होता येत नाही. आपले ध्येय गाठता येत नाही. निर्भय व्हा धाडसाने वाटचाल करा, ही स्पर्धा स्वतःची स्वतःशीच आहे पालक आणि बालक मिळून सतर्क राह्यलाय शिका असे परखड मत व्यक्त केले. आई, बाप ही बिरुदावली नसून महत्त्वाची जबाबदारी आहे हे ही त्यांनी आपल्या समारोपात अधोरेखित केले.
- शेवटी आभार प्रदर्शन सह प्राध्यापक श्री आय सी सावंत यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका , श्रीमती . एम.वाय. देसाई यांनी केले.