Home » गर्लगुंजीच्या कबड्डी महासंग्रामात ताराराणीच्या मुलींचा डंका! ताराराणी महाविद्यालयाचा संघ उपविजेता

गर्लगुंजीच्या कबड्डी महासंग्रामात ताराराणीच्या मुलींचा डंका! ताराराणी महाविद्यालयाचा संघ उपविजेता

file_000000003eb08211ae725762661ace99

₹८,५०० रोख पारितोषिकासह आकर्षक चषकावर नाव कोरले; कर्णधार दिव्या शिरोडकर ठरली उत्कृष्ट चढाईपटू!

गर्लगुंजी (प्रतिनिधी) : न्यू मराठा संघ, गर्लगुंजी यांच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य कबड्डी महासंग्रामात मराठा मंडळ संचलित म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. यापूर्वी कित्तूर, नंदगड आणि रामदुर्ग येथे विजय मिळवणाऱ्या ताराराणीच्या संघाने गर्लगुंजी येथेही आपल्या खेळाचा ठसा उमटवला. या यशाबद्दल संघाला ८,५०० रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत ताराराणीच्या खेळाडूंनी अफाट ऊर्जा, जिद्द, चपळाई आणि सांघिक एकजुटीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. उपांत्यपूर्व सामन्यात नंदिहळ्ळी, तर उपांत्य सामन्यात सांगली संघावर मात करत संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

या स्पर्धेत कर्णधार दिव्या शिरोडकर हिने वेगवान आणि अचूक चढायांच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या प्रभावी खेळाची दखल घेत तिला ‘उत्कृष्ट चढाईपटू’ (Best Raider) पुरस्काराने गौरविण्यात आले. मराठा मंडळाचे संचालक शिवाजी पाटील यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव उपस्थित होते.

रेणुका गुरव हिनेही बोनस आणि टच पॉईंट्स मिळवत संघाच्या विजयासाठी मोलाचे योगदान दिले. तर पल्लवी पाटील हिने उत्कृष्ट बचाव करत प्रतिस्पर्धी संघाच्या चढायांना प्रभावीपणे रोखले. चढाई आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर ताराराणीच्या खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध केली.

या संघात दिव्या शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुप्पटगिरी), रेणुका गुरव (गणेबैल), सृष्टी हंगिरकर (यडोगा), धनश्री भोसले (लालवाडी), श्रावणी पाटील (कुप्पटगिरी), कार्तिकी लोकलुचे (धामणे), लक्ष्मी गोरल (माडी-गुंजी) आणि आरती तोरगल (चापगाव) या खेळाडूंचा समावेश होता.

मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कबड्डी प्रशिक्षक प्रशांत पांखरे, भीमसेन पाटील व भरमाजी पाटील यांचे मार्गदर्शन, तसेच प्राचार्य अरविंद पाटील आणि सर्व प्राध्यापकांचे प्रोत्साहन या यशासाठी महत्त्वाचे ठरले. पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

ताराराणीच्या मुलींनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us